आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • ICC T20I Rankings| Marathi News | Rohit Sharma Virat Kohli Vs Babar Azam; ICC T20I Match Player Rankings International Cricket Council

कोहलीला दणका:टी-20 च्या टॉप-10 रँकिंगमधून विराट कोहली बाहेर; पाकिस्तानचा कर्णधार बाबर पहिल्या क्रमांकावर

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीला आणखी एक दणका बसला आहे. टी-20 वर्ल्ड कप आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सिरीजमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या भारतीय ओपनर केएल राहुलने कोहलीला पिछाडीवर सोडले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल ICC ने टी-20 ची ताजी रँकिंग जारी केली. त्यातील टॉप-10 मधून विराट कोहली बाहेर पडला.

टॉप-10 रँकिंगमध्ये केवळ एक भारतीय खेळाडू केएल राहुलला स्थान मिळाले आहे. तो सहाव्या क्रमांकावरून आता पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर हिटमॅन म्हणून ओळखल्या जाणारा कर्णधार रोहित शर्मा थेट 15 वरून 13 व्या क्रमांकावर आला.

11 व्या क्रमांकावर पोहोचला कोहली
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरीजमध्ये विश्रांती घेतली होती. त्यामुळेच तो टी-20 च्या सर्वश्रेष्ठ 10 खेळाडूंच्या यादीतून बाहेर झाला. त्याला 11 व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. टी-20 वर्ल्ड कपमध्ये कोहलीने पाकिस्तानच्या विरोधात फिफ्टी केली होती. तर उर्वरीत सामन्यांमध्ये त्याची कामगिरी काही विशेष नव्हती.

राहुल-रोहित सुसाट
टी-20 विश्वचषकासह न्यूझीलंडविरुद्धच्या सिरीजमध्ये सुद्धा राहुल आणि रोहितने चांगली कामगिरी केली. एकीकडे राहुलने वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानच्या विरोधात 69 धावा, स्कॉटलंडच्या विरोधात 50 धावा तर नामिबियाच्या विरोधात 50 आणि रांचीत न्यूझीलंडविरुद्ध 65 धावा ठोकल्या होत्या. तर दुसरीकडे रोहित किवींच्या विरोधात प्लेअर ऑफ द सिरीज ठरला.

टॉप-10 मध्ये परतला गुप्टिल
न्यूझीलंडचा ओपनर मार्टिन गुप्टिल पुन्हा टॉप-10 मध्ये परतला. त्याने टी-20 सीरीजमध्ये भारताच्या विरोधात दोन-दोन अर्धशतके ठोकली. गुप्टिल रँकिंगमध्ये 10 व्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तानचा ओपनर मोहम्मद रिझवान सुद्धा चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. यादीत पाकचाच कर्णधार बाबर आझम पहिल्या, इंग्लंडचा डेव्हिड मलान दुसऱ्या तर दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्करम तिसऱ्या क्रमांकावर आहे.

बातम्या आणखी आहेत...