आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट:आयसीसीचा मोठा निर्णय, पुढील टी-20 विश्वचषकात 20 संघ 4 गटांत विभागणार

नवी दिल्ली9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयसीसीने २०२४ मध्ये होणाऱ्या पुढील टी-२० विश्वचषकासाठी अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. अमेरिका व वेस्टइंडीज हे संयुक्तरित्या स्पर्धेचे यजमानपद भूषवतील. या टी-२० विश्वचषक स्पर्धेत तीन टप्पे असतील. पहिल्या टप्प्यात २० संघ ५-५ च्या ४ गटांत विभागले जातील. दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक गटातील टॉप-२ संघांचा सुपर-८ गट तयार होईल. तिसऱ्या टप्प्यात या ८ संघांना ४-४ च्या दोन गटांत विभागले जाईल. त्यापैकी २-२ प्रमुख संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. यात जिंकणाऱ्या दोन संघांत अंतिम लढत होईल. टी-२० वर्ल्डकप २०२२ मध्ये १६ संघ होते. त्यापैकी ८ संघांना थेट सुपर-१२ मध्ये स्थान मिळाले होते. ४ संघांना पात्रता फेरीतून जावे लागले. हे १२ संघ पात्र; २०२४ टी-२० वर्ल्डकपसाठी वेस्टइंडीज व अमेरिका यजमान असल्याने दोन्ही संघ थेट पात्र झाले आहेत. मागील टी-२० वर्ल्डकपच्या सुपर-१२ च्या टॉप-८ संघांनाही थेट प्रवेश मिळाला आहे. अफगाणिस्तान व बांगलादेशनेही रँकिंगनुसार आपले स्थान पक्के केले आहे. आता एकूण २० पैकी ८ संघांचे स्लॉट बाकी आहेत.

बातम्या आणखी आहेत...