आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • ICC's Highest Earnings From ODIs; So The Format Will Remain The Same, Says Former West Indies Referee Holding

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट:आयसीसीची सर्वाधिक कमाई वनडेतून; त्यामुळे हा फाॅरमॅट कायम राहणार, विंडीजचे माजी गाेलंदाज हाेल्डिंग यांचे मत

किंग्जटन9 महिन्यांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • आयपीएल आयाेजनाचा अधिकार बीसीसीआयचा

क्रिकेट विश्वात मर्यादित षटकांचा फाॅरमॅट वनडेला प्रचंड लाेकप्रियता लाभलेली आहे. याशिवाय आयसीसीला याच फाॅरमॅटमधून माेठ्या प्रमाणात आर्थिक कमाई करता येते. त्यामुळे हाच फाॅरमॅट अधिक चर्चेत आणि भविष्यात अस्तित्वासह कायम राहणार आहे, अशी प्रतिक्रिया विंडीजचे माजी वेगवान गाेलंदाज मायकल हाेल्डिंग यांनी दिली. मात्र, त्यांनी छाेट्या फाॅरमॅटवर टीका केली. हाेल्डिंगशिवाय भारताचा माजी कसाेटीपटू राहुल द्रविड आणि पाँटिंगनेही टी-२० च्या लाेकप्रियतेचा वनडेवर पडत असलेल्या परिणामाबाबत शंका उपस्थित केली हाेती. ‘आयसीसी भविष्यात कधीही वनडे या फाॅरमॅटला हटवणार नाही. कारण, या मर्यादित षटकाच्या सामन्यातून आयसीसीला माेठी कमाई करता येते. याशिवाय याच फाॅरमॅटच्या प्रक्षेपण हक्कासाठी माेठी बाेली लावली जाते. चाहत्यांमध्येही हाच फाॅरमॅट लाेकप्रिय आहे,’ असेही हाेल्डिंग म्हणाले.

आयपीएल आयाेजनाचा अधिकार बीसीसीआयचा

उद्या बुधवारी आॅस्ट्रेलियातील टी-२० विश्वचषकाच्या आयाेजनाबाबत ठाेस असा निर्णय घेण्यात येईल. मात्र, सध्याची परिस्थिती अधिकच गंभीर आहे. त्यामुळे क्रिकेट आॅस्ट्रेलिया या स्पर्धेच्या आयाेजनाबाबत निरुत्साही आहे. अशात भारतामध्ये आयपीएलची स्पर्धा निश्चितपणे आयाेजित केली जाऊ शकेल. या लीगच्या आयाेजनाचे सर्व अधिकार हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे आहेत, असेही यादरम्यान हाेल्डिंग यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...