आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

विश्वचषक:आयसीसीच्या दुबळ्या नेतृत्वाने टी-20 विश्वचषकावरचा ठाेस निर्णय नाही : बीसीसीआय  

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • टी-20 विश्वचषकावरचा ठाेस निर्णय नाही

ऑस्ट्रेलियामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-२० विश्वचषक होणार आहे. मात्र, कोरोनामुळे त्याच्या आयोजनावर संशय आहे. गुरुवारी आयसीसीच्या झालेल्या बैठकीत स्पर्धेबाबत कोणताही निर्णय झाला नाही. अशात बीसीसीआय आयपीएलच्या आयोजनावर काेणताही निर्णय घेऊ शकत नाही. टी-१० लीग अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. 

विश्वचषक स्थगित झाल्यानंतर त्याचे आयोजन हाेऊ शकते. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, आयसीसीचे नेतृत्व कमजोर आहे. नाही तर, इतक्या मोठ्या स्पर्धेच्या आयोजनाबाबत आतापर्यंत निर्णय झाला असता. कारण, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि आयसीसीचे आर्थिक व वाणिज्य व्यवहार समितीचे प्रमुख एहसान मनी स्पर्धेच्या आयोजन करण्यात असमर्थ असल्याचे म्हटले आहे. 

सध्याची चालू परिस्थिती पाहता बहुसंख्य लोकांना वाटते की, स्पर्धा रद्द केली जावी.  आयपीएल प्रमुख ब्रजेश पटेलने स्पष्ट केले आहे की, आम्ही स्पर्धेचे नियोजन तेव्हा करू शकतो, ज्या वेळी विश्वचषकाच्या आयोजनावर काही निर्णय घेतल्या जात नाही. अधिकाऱ्याने म्हटले की, आम्ही सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये विंडो पाहत आहे, मात्र ते आशिया कप आणि टी-२० विश्वचषक स्थगित झाल्यावर शक्यता आहे. त्यामुळेच सध्या या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पुढच्या महिन्यात याचा निर्णय हाेईल.