आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट:सुपर पाॅवर मिळाल्यास धाेनीला भेटणार : यजुवेंद्र चहल

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • चहलने इन्स्टाग्रामवर लाइव्ह चॅटदरम्यान दिली अनेक प्रश्नांची उत्तरे

अदृश्य हाेण्याची सुपर पाॅवर मिळाल्यास मी सर्वप्रथम रांची येथे जाऊन लाडक्या महेंद्रसिंग धाेनीची पहिल्यांदा भेट घेणार असल्याची प्रतिक्रिया भारतीय संघाच्या फिरकीपटू यजुवेंद्र चहलने इन्स्टाग्रामवर चॅट करताना दिली. टीव्ही प्रेझेंटर याशिका गुप्तासाेबत चहलने इन्स्टाग्रामवर लाइव्ह चॅट केले. यादरम्यान त्याने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. 

काेराेनामुळे सध्या देशभरात लाॅकडाऊन करण्यात आला. त्यामुळे सध्या हरियाणातील हा फिरकीपटू आपल्या घरीच आहे. यादरम्यान त्याच्याशी याशिकाने इन्स्टाग्रामवरून संवाद साधला. आपण धाेनीच्या भेटीसाठी अधिकच आतुर झालाे आहे. त्यामुळे मला अदृश्य हाेण्यासारखी एखादी सुपर पाॅवर मिळायला हवी. याच्या माध्यमातून मी थेट धाेनीची भेट घेणार आहे. याशिवाय विमानसेवा सुरू झाल्यास माझा पहिला दाैरा हा रांचीचा असेल, असेही त्याने या वेळी लाइव्ह चॅट करताना सांगितले. पबजी  खेळत नाही, असेही ताे म्हणाला.

कॅटरिनाच्या प्रेमात : विराट काेहलीच्या विवाहसाेहळ्यादरम्यान कॅटरिनाच्या दर्शनाने भारताच्या फिरकीपटू यजुवेंद्र चहलला चांगलेच वेड लावले. कॅटरीना हीच आवडती अभिनेत्री असल्याचेही त्याने सांगितले. आपण अद्यापही सिंगलच असल्याचे ताे म्हणाला.

बातम्या आणखी आहेत...