आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • If We Lose Today We Will Lose The Series And If We Win... Bumrah Is Fully Fit After 5 Years In India Against Australia.

टीम इंडियाने दुसरा T20 सामना 6 गडी राखून जिंकला:रोहित शर्माची 20 चेंडूत 46 धावांची धमाकेदार खेळी; मालिकेत 1-1 अशी बरोबरी

नागपूर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना भारताने 6 गडी राखून जिंकला. रोहित शर्माने (46) आपल्या धमाकेदार खेळ करुन सामन्यात विजय मिळवून दिला.

नागपूरच्या विदर्भ क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्याला ओल्या मैदानामुळे 2 तास विलंब झाला. हा सामना 8-8 षटकांचा होता. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

ऑस्ट्रेलियाने निर्धारित 8 षटकात पाच गड्यांच्या मोबदल्यात 90 धावा केल्या व भारताला विजयासाठी 91 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान भारताने 8 व्या षटकांतील दुसऱ्या चेंडूवर पार करीत विजयश्री संपादन केली.

हैदराबादेत दोन्ही संघ लढणार

यापूर्वी ऑस्ट्रेलियाने मोहातील सामन्यात विजय मिळवला होता. त्यामुळे दोन्ही संघाने 1-1 अशी बरोबरी साधली. त्यानंतर आता हैदराबादच्या सामन्यात विजय मिळवणारा संघ T20 सीरीजचा विजेता ठरणार आहे. ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेडने सर्वाधिक 43 धावा केल्या. त्याचवेळी भारताकडून अक्षर पटेलने 2 बळी घेतले.

भारताकडून या सामन्यात अक्षर पटेलने सर्वाधिक 2 बळी घेतले.
भारताकडून या सामन्यात अक्षर पटेलने सर्वाधिक 2 बळी घेतले.

ऑस्ट्रेलियाचे 2 फलंदाज एकाच षटकात पॅव्हेलियनमध्ये

सामन्याच्या दुसऱ्याच षटकात कॅमेरून ग्रीन आणि ग्लेन मॅक्सवेल पॅव्हेलियनमध्ये परतले. ग्रीनला विराट कोहलीने शानदार थ्रो मारून धावबाद केले. त्याचवेळी अक्षर पटेलने ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर ग्लेन मॅक्सवेलला क्लीन बोल्ड केले. पटेल जेव्हा चौथे षटक टाकायला आला तेव्हा त्याने टीम डेव्हिडलाही केवळ 2 धावांवर बाद केले.

त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‌ॅरॉन फिंचला जसप्रीत बुमराहने शानदार यॉर्करवर बाद केले.

विराट कोहलीच्या या थ्रोवर कॅमेरून ग्रीन धावबाद झाला.
विराट कोहलीच्या या थ्रोवर कॅमेरून ग्रीन धावबाद झाला.

ऋषभ पंत आणि जसप्रीत बमुराह यांचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. त्याचवेळी उमेश यादव आणि भुवनेश्वर कुमार यांना प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले आहे.

सामन्याला 2 तास 15 मिनिटे उशिर

दुसरा T20 सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार होता, परंतु मैदान ओले असल्यामुळे सामना 2 तास 15 मिनिटे सुरू होऊ शकला नाही. अंपायरने तिसऱ्यांदा मैदानाची पाहणी केली. त्यानंतर सामना 8-8 षटकांचा होईल आणि दोन षटकांचा पॉवरप्ले असेल हे ठरले.

मैदान कोरडे करण्यासाठी ग्राउंड्समन सर्वतोपरी प्रयत्न करताना.
मैदान कोरडे करण्यासाठी ग्राउंड्समन सर्वतोपरी प्रयत्न करताना.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारत - केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, दिनेश कार्तिक, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल.

ऑस्ट्रेलिया - अ‌ॅरॉन फिंच (क), कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, शॉन अ‌ॅबॉट, मॅथ्यू वेड, टिम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, अ‌ॅडम झाम्पा, पॅट कमिन्स, जोस हेझलवूड.

आम्ही तुम्हाला सामन्याशी संबंधित काही तथ्यांसह हेड टू हेड रेकॉर्ड, खेळपट्टीचे अहवाल, हवामान परिस्थिती आणि संभाव्य प्लेइंग इलेव्हन बद्दल जाणून घेऊ या...

बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे

सामन्याच्या एक दिवस आधी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना टीम इंडियाच्या सूर्यकुमार यादवने सांगितले की, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या तंदुरुस्तीबद्दल काळजी करण्यासारखे काही नाही. बुमराह आता पूर्णपणे फीट झाला आहे. या विधानानंतर बुमराह या सामन्यात खेळू शकेल अशी अपेक्षा करता येईल. बुमराहच्या अनुपस्थितीत आधी आशिया कपमध्ये आणि आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाची गोलंदाजी खराब झाली आहे.

भुवनेश्वर कुमार सलग तीन सामन्यांत 19व्या षटकाचा दबाव हाताळण्यात अपयशी ठरला आहे. हर्षल पटेलचे पुनरागमनही विस्मरणीय ठरली मॅथ्यू वेड अर्ध्या खेळपट्टीवर फटके मारत आपला हाफ ट्रॅकर स्लोअर चेंडू सीमारेषेबाहेर मारत होता जणू मॅच नव्हे तर नेट सेशनमध्ये सराव करत होता. अशा परिस्थितीत जसप्रीतची पुनरागमन होणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. अन्यथा ऑस्ट्रेलिया पुन्हा भारताच्या कमकुवत गोलंदाजीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करेल.

पहिल्या सामन्यात काय घडले तेही पुन्हा एकदा पाहुया….

सिरिजमध्ये पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा चार गडी राखून पराभव केला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 विकेट्सवर 208 धावा करत या फॉरमॅटमधील सर्वोच्च धावसंख्या उभारली. तर लक्ष्याचा पाठलाग करत कांगारू संघाने 19.2 षटकांत 6 गडी गमावून लक्ष्य गाठले.

कॅमेरून ग्रीनने सर्वाधिक 61 धावा केल्या. त्याचवेळी हार्दिक पंड्याने टीम इंडियासाठी अप्रतिम खेळी केली. त्याने अवघ्या 30 चेंडूत 71 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमध्ये 7 चौकार आणि 5 षटकार होते. अक्षर पटेल वगळता सर्व भारतीय गोलंदाज फ्लॉप ठरले.

लाइव्ह टेलिकास्ट कुठे बघायचे?

या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर केले जाणार आहे. यासोबतच या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने + हॉटस्टार अ‍ॅपवर पाहता येईल. तसेच, तुम्हाला दिव्य मराठी अ‍ॅपवर सामन्याची लाइव्ह स्कोअर पाहायला मिळेल.

पावसामुळे खेळात व्यत्यय येण्याची शक्यता

नागपुरात पावसामुळे टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना गुरुवारी सराव करता आला नाही. आजच्या सामन्यावरही पावसाची शक्यता आहे. गुरुवारी दुपारी खेळपट्टी पाहण्यासाठी ग्राउंड्समननी कव्हर काढून टाकले, पण रिमझिम पावसाच्या धोक्यामुळे लवकरच कव्हर पुन्हा लावण्यात आले. या स्टेडियममध्ये तीन वर्षांत पहिल्यांदाच इंटरनॅशनल सामना खेळवला जाणार आहे.

खेळपट्टी कशी असेल, टॉसवर खेळ होऊ शकतो

खेळपट्टी लक्ष्याचा पाठलाग करण्यास अनुकूल नसल्याने या मैदानावर टॉस जिंकणारा संघ पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. येथे गोलंदाजांबरोबरच फलंदाजांनाही मदत मिळते. येथे दुसऱ्या डावात फलंदाजी करणे थोडे कठीण आहे. दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या फक्त 128 धावांची आहे.

आतापर्यंत येथे एकूण चार T20 इंटरनॅशनल सामने खेळले गेले आहेत, ज्यापैकी संघाने दोन जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत. या स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ पहिल्यांदाच टी-20 सामना खेळण्यासाठी उतरणार आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

मोहाली येथे झालेल्या पहिल्या T-20 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या संपूर्ण संघाने शानदार कामगिरी केली. अशा परिस्थितीत त्याच्या संघात कोणताही बदल होणार नाही. येथे टीम इंडियामध्ये दोन बदल निश्चित मानले जात आहेत. उमेश यादवच्या जागी जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमारच्या जागी दीपक चहर प्लेइंग-11 मध्ये दिसू शकतात.

भारत - केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, दिनेश कार्तिक, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल.

ऑस्ट्रेलिया - एरॉन फिंच (क), जोस इंग्लिस, स्टीव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड, टिम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, एडम झाम्पा, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, नॅथन एलिस.

बातम्या आणखी आहेत...