आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात ऋतुराज गायकवाडची बॅट खूप तळपली. त्याने आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्टयाच्या चेंडूंवर मारा केला. गायकवाडच्या झंझावाती फलंदाजीमुळे एनरिकने एका षटकात (भारतीय डावातील 5 वे षटक) 20 धावा दिल्या. त्यात सलग पाच चौकारांचा समावेश होता. गायकवाडच्या बॅटमधून चार चौकार आले, तर एक चौकार लेग बायमधून आला. गायकवाडने या डावात 35 चेंडूत 162 च्या स्ट्राईक रेटने 57 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 2 षटकार मारले.
कारकिर्दीतील पहिले अर्धशतक
गायकवाडने गेल्या वर्षी श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या सामन्यापूर्वी त्याने 5 सामने खेळले होते, परंतु त्याच्या नावावर एकही अर्धशतक नाही. विशाखापट्टणम येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या डावात त्याने कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले.
जाणून घ्या एनरिक विरुद्ध लागोपाठ पाच चौकारांचा तपशील
मालिकेतील पहिले दोन सामने ठरले फ्लॉप
कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्या अनुपस्थितीत सलामीवीर म्हणून गायकवाडला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले. रोहित शर्मा आणि विराट कोहलीला IPL नंतर या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. त्याचवेळी केएल राहुलला मालिका सुरू होण्यापूर्वी दुखापत झाली आणि तो स्पर्धेतून बाहेर पडला. दिल्ली आणि कटकमध्ये झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये गायकवाडला फारशी कामगिरी करता आली नाही. त्याने दिल्लीत 23 चेंडूत 15 धावा आणि कटकमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात 4 चेंडूत 1 धावा काढल्या.
IPL 2022 मध्ये झळकावली तीन अर्धशतके
IPL च्या 15 व्या हंगामात, गायकवाडने चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना 14 सामन्यात 26.88 च्या सरासरीने 368 धावा केल्या, त्यात 3 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचा स्ट्राइक रेट 126.46 राहिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.