आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराCBI ने शनिवारी IPL सट्टेबाजीबाबत मोठा खुलासा केला आहे. CBI ने सांगितले की, 2019 मधील IPL टूर्नामेंटमधील सामन्यांच्या निकालावर प्रभाव टाकण्यासाठी पाकिस्तानकडून मिळालेल्या इनपुटच्या आधारे बेटिंग नेटवर्कने काम केले. हे संपूर्ण नेटवर्क पाकिस्तानमधून चालवले जात असल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.
याप्रकरणी CBI ने गुन्हाही दाखल केला आहे. मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजीच्या आरोपाखाली 3 जणांना अटक करण्यात आली आहे. CBI ने दिल्ली, जोधपूर, हैदराबाद आणि जयपूर येथील 7 ठिकाणी छापे टाकले आहेत. छाप्यांद्वारे 2019 च्या IPL फिक्सिंगमध्ये गुंतलेल्या सिंडिकेटचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यंदाच्या हंगामात पाकिस्तानहून IPL सामन्यांच्या निकालावर प्रभाव टाकण्याचा आरोप आहे.
IPL बेटिंग प्रकरणी CBI चे 5 मोठे खुलासे
बेटिंग नेटवर्क 2010 पासून सक्रिय
CBI ने FIR मध्ये दिलीप कुमार, गुर्राम सतीश, गुर्राम वासू सज्जन सिंग, प्रभु लाल मीना, राम अवतार आणि अमित कुमार शर्मा यांची नावे दिली आहेत. CBI ने सांगितले की, काही सरकारी अधिकारी 2010 पासून IPL बेटिंगमध्ये सक्रिय आहेत. याशिवाय आणखी काही अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
CBI कडून भारतातील सर्व सट्टेबाजी नेटवर्कची चौकशी सुरु
CBI भारतभर बेटिंग नेटवर्कचा तपास करत आहे, ज्यांचे पाकिस्तानशी थेट संबंध आहेत. अनेक शहरांमध्ये अनेकांची चौकशी सुरू आहे. कोणत्या सामन्यांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला हे तपास यंत्रणेकडून अद्याप सांगण्यात आलेले नाही.
फिक्सिंगचा जिन्न पहिल्यांदा IPL 6 मध्ये झाला होता उघड
16 मे 2013 रोजी, IPL 6 दरम्यान, दिल्ली पोलिसांनी श्रीशांत आणि राजस्थान रॉयल्सचे इतर दोन खेळाडू, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांना स्पॉट-फिक्सिंगच्या आरोपाखाली मुंबईतून अटक केली. या स्पॉट फिक्सिंगमध्ये श्रीशांतचा चुलत भाऊ आणि गुजरातचा माजी अंडर-22 खेळाडू जीजू जनार्दनची महत्त्वाची भूमिका असल्याचा आरोप करण्यात आला होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.