आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • In The Women's World Cup, West Indies Easily Won By 140 Runs, Bangladesh Were Bowled Out For 136 Runs |marathi News

वेस्टइंडीज ने बांग्लादेश ला 4 धावांनी केले पराभूत::महिला विश्वचषक मध्ये वेस्टइंडीज ने 140 धावांवर सहज मिळवला विजय, बांग्लादेश 136 धावांवर बाद

न्यूजीलैंड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिला विश्वचषक मध्ये शुक्रवारी १७ व्या सामन्यात वेस्टइंडीजने बांगलादेशला ४ धावांनी पराभूत केले. पहिल्यांदा फलंदाजीसाठी खेळपट्टीवर उतरलेला वेस्टइंडीज संघने बांगलादेशला १४० धावांच लक्ष दिले. तरी देखील बांगलादेश संघ विजय मिळवण्यास अपयशी ठरला. बांगलादेशला शेवटच्या एका षटकात आठ धावांची आवश्यकता होती, पण स्टेफानी टेलर ने स्वत:च्या तिसर्या चेंडुवर फरीहा तृष्णा ला त्रिफलाचित करत संघाला विजयी केले. बांग्लादेशाचा संपुर्ण संघ १३६ धावांवरती बाद झाला. पहिल्यांदा फलंदाजीसाठी खेळपट्टीवर उतरलेला वेस्टइंडीजच्या संघातर्फे सर्वात जास्त ५३ धावा शीमेन कैम्पबेल ने बनवल्या. याशिवाय हेली मैथ्यूज ने १८ तर डिएंड्रा डॉटिन ने १७ धावांची खेळी केली. बांग्लादेश संघातर्फे सलमा खातून आणि नाहिदा अख्तर ने प्रत्येकी २-२ बळी घेतले. रुमाना अहमद, ऋतु मोनी आणि जहानारा आलम यांनी १-१ बळी घेतले.

बांग्लादेशची फलंदाजी अपयशी
१४० धावांचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरूवात काही जास्त चांगली झाली नाही. यष्टीरक्षक शमीमा सुल्ताना शून्य धावांवर बाद झाली. शारमीन अख्तर आणि फरगाना हक यांनी खेळाला सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु हेली मैथ्यूज ने त्यांनाही तंबुत पाठवले. कर्णधार निगार सुल्ताना ही ७७ चेंडुपर्यंत धावपट्टीवर उभा राहिली. परंतु ती ही हेली मैथ्यूज च्या भेदक मार्यासमोर टिकु शकली नाही. फरगाना हक सुद्धा २३ धावा बनवु शकली. बांगदेश संघाचे ६० धावांवर ५ गडी बाद झाले होते. सलमा खातून ने ४० चेंडुंवर २३ धावा बनविल्या. त्याचवेळी, नाहिदा अख्तर ही शेवटपर्यंत धावपट्टीवर उभा राहिली, पण तिच्या नाबाद २५ धावा संघाला विजय मिळवु देऊ शकल्या नाहीत.

हेली मैथ्यूज ठरली विजयाची नायिका

वेस्टइंडीज संघाच्या विजयाची नायिका हेली मैथ्यूज ठरली. तिने १० षटकामध्ये केवळ १५ धावा देत ४ बळी घेतले. ही आत्तापर्यंतची तिची उत्तम खेळी होती. याशिवाय कर्णधार स्टेफानी टेलर ने २९ धावा देत ३ गडी बाद केले. एमी फ्लेचर ने सुद्धा ३ बळी घेतले.

पॉइंट टेबलमध्ये वेस्टइंडीज तिसर्या स्थानावर
महिला विश्वचषक २०२२ मध्ये सलग तिसरा सामना जिंकत वेस्टइंडीज संघ पॉइंट टेबल मध्ये तिसर्या स्थानावर पोहोचला. वेस्टइंडीज चे ६ गुण आहेत आणि तो भारताच्या पुढे गेला आहे. ४ सामन्यात ४-४ सामने जिंकत ऑस्ट्रेलिया पहिल्या तर साउथ अफ्रीका दूसर्या स्थानावर आहे.

बातम्या आणखी आहेत...