आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराक्रिकेटविश्वात चांगल्या क्षेत्ररक्षणाचा उल्लेख झाला की प्रथम दक्षिण आफ्रिकेचे नाव येते. जॉन्टी ऱ्होड्ससह अनेक आफ्रिकन खेळाडूंनी क्षेत्ररक्षणाच्या बळावर जगभरातील असंख्य चाहते बनवले. मात्र, गुरुवारी दिल्लीत भारत विरुद्ध पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पूर्णपणे उलट दृश्य पाहायला मिळाले.
आफ्रिकन खेळाडूंनी झेल सोडले, स्टंपिंगच्या संधी हुकल्या आणि धावबादच्या सोप्या संधीही गमावल्या. जीवनदान मिळाल्यावर भारतीय खेळाडूंनी 70 अतिरिक्त धावा जोडून धावसंख्या 200च्या पुढे नेली. मात्र, या सगळ्यानंतरही हा सामना जिंकण्यात आफ्रिकन संघाला यश आले. या सामन्यात आफ्रिकन स्टार्सनी केव्ह-केव्हा खराब क्षेत्ररक्षण केले ते जाणून घेऊया...
1 षटकात भारतीय फलंदाजांना दोन जीवदान
भारतीय डावाच्या 11व्या षटकात श्रेयस अय्यरची पहिली स्टंपिंगची संधी हुकली, त्यानंतर त्याच षटकात ऋषभ पंतचा झेल सोडला. 11 व्या षटकात केशव महाराजने टाकलेला चेंडू अय्यर समजू शकला नाही आणि बीट झाला. यष्टिरक्षक क्विंटन डी कॉकला चेंडू व्यवस्थित पकडू शकला नाही आणि त्याने अय्यरला स्टंप आऊट करण्याची सोपी संधी गमावली. त्यावेळी अय्यर 13 धावांवर खेळत होता. यानंतर त्याने आणखी 23 धावा केल्या.
त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर इशान किशनने स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू मिड-विकेटच्या वर गेला. तो झेलबाद होईल असे वाटत होते. तेथे तीन क्षेत्ररक्षकही उपस्थित होते, पण कोणीही चेंडूला जज करू शकले नाही आणि एक सोपा झेल सुटला. त्यावेळी ईशानने 38 चेंडूत 58 धावा केल्या होत्या. यानंतर त्याने आणखी 18 धावा केल्या. नंतर केशव महाराजने इशानची विकेट घेतली.
पंत धावबाद झाला असता
13व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पंतला धावबाद करण्याची संधी गमावली. इशान बाद झाल्यानंतर पंत स्वतः चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. अय्यर स्ट्राइकवर होता, तर पंत नॉन स्ट्राइकवर उभा होता. रबाडाने ऑफ-स्टंपच्या दिशेने चेंडू टाकला, अय्यर तो मिडविकेटच्या दिशेने खेळला. तेवढ्यात पंत धाव घेण्यासाठी धावला. अय्यरने त्याला परत पाठवले. क्षेत्ररक्षकाने चेंडू नॉनस्ट्राईकच्या दिशेने फेकला तोपर्यंत पंत क्रीजवर पोहोचला होता. पंतने 16 चेंडूत 29 धावा केल्या. त्याने 2 चौकार आणि 2 षटकारही मारले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.