आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिडनी टेस्टपूर्वीच वाद:रोहितसह 5 आयसोलेटेड खेळाडू भारतीय संघासोबतच जाणार; क्वीन्सलँडने म्हटले - नियमांचे पालन करायचे असेल तर ब्रिस्बेनला या

मेलबर्न4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बायो-बबल नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रोहितसह 5 खेळाडूंची चौकशी सुरू आहे

भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा नियम आणि कायदावरून वादात आला आहे. दोन विवाद आहेत. पहिला - रोहित शर्मा, शुभमन गिल, पृथ्वी शॉ. ऋषभ पंत आणि नवदीप सैनी यांच्यावर बायो-बबल नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे आणि चौकशी सुरू आहे. दुसरा वाद - कोरोनाच्या कठोर नियमांमुळे टीम इंडियाला ब्रिस्बेनमध्ये चौथा कसोटी सामना खेळण्याची इच्छा नाही.

या दरम्यान, बायो बबल तोडण्याच्या आरोपाखाली असलेले पाच खेळाडू सोमवारी सिडनीला रवाना होतील, जिथे तिसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. दुसरीकडे टीम इंडियाला नियमांचे पालन करायचे असेल तरच चौथा कसोटी सामना खेळण्यासाठी ब्रिस्बेनला यावे, अशा कडक सूचना क्वीन्सलँड सरकारने दिल्या आहेत.

प्रोटोकॉलचे पालन करण्याचा सल्ला दिला

क्वीन्सलँड सरकारच्या क्वीन्सलँड सरकारचे शॅडो आरोग्य मंत्री रॉस बॅट्स आणि क्रीडा मंत्री टिम मॅन्डर यांनी भारतीय संघाला प्रोटोकॉलचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. वस्तुतः ऑस्ट्रेलियामधील राज्यांमध्ये विरोधी पक्षाचे मंत्रीदेखील सरकारच्या मंत्र्यांच्या कारभारावर नजर ठेवतात. विरोधी पक्षाचे नेते त्यांची नेमणूक करतात. म्हणजेच विरोधकांनी निवडलेल्या मंत्र्यांना शॅडो मंत्री म्हणतात.

कोरोना नियमांचे पालन न केल्यास प्रवेश नाही

बेट्स यांनी फॉक्स स्पोर्ट्सची संवाद साधताना म्हटले की, नियमांचे पालन न केल्यास क्वीन्सलँड सरकार भारतीय संघाला प्रवेश दिला जाणार नाही. भारतीय संघाला नियमांचे पालन करायचे नसेल तर त्यांनी येथे येऊ नये असेही त्यांनी म्हटले आहे. पूर्वीच्या रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की क्वारंटाइनच्या नियमांमुळे भारतीय संघ ब्रिस्बेनमध्ये खेळू इच्छित नाही, कारण प्रशिक्षणाशिवाय इतर खेळाडूंना बाहेर जाऊ दिले जाणार नाही.

तसेच मॅन्डर म्हणाले की, कोणासाठीही नियमांमध्ये बदल केला जाणार नाही. सर्वांनाच नियमांचे पालन करावे लागेल. जर भारतीय संघाला क्वारंटाइन नियमांचे पालन करायचे नसेल तर त्यांनी येथे येऊ नये.

रोहितसह पाच खेळाडू टीम इंडियासह सिडनीत पोहोचतील

असे असले तरी रोहित शर्मासह पाच खेळाडू भारतीय संघांसोबत सिडनीत पोहोचणार आहे. या पाचही खेळाडूंची बायो-बबलचे नियम तोडल्याबद्दल चौकशी सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...