आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉक्सिंग-डे टेस्ट:मेलबर्नमध्ये अजिंक्य खेळीने भारताचा आनंदोत्सव; ‘शतकी कसोटी’त ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय

मेलबर्न4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारताची मालिकेत 1-1 ने बरोबरी; 7 जानेवारीपासून तिसरी कसोटी

मेलबर्नच्या मैदानावरील अजिंक्य खेळीतून टीम इंडियाने आपल्या कसोटीच्या इतिहासात सर्वात दमदार पुनरागमन केले. सामनावीर अजिंक्य रहाणेच्या खणखणीत खेळी व कुशल नेतृत्वातून भारताने दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियावर आठ गड्यांनी विजय संपादन केला. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा २०० धावांत खुर्दा उडाला. यासह भारताने दाेन गड्यांच्या माेबदल्यात १५.५ षटकांत ७० धावांचे लक्ष्य सहज गाठून कसोटीत विजय साकारला. यातून भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीचे शतक विजयाने साजरे केले. या दाेन्ही टीममधील ही १०० वी कसाेटी हाेती. आता विजयासह टीमने चार कसाेटी सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बराेबरी साधली. पुढच्या वर्षी ७ जानेवारी २०२१ पासून तिसऱ्या कसोटीला सुरुवात हाेईल. १३३ वर्षांनी एखाद्या संघाने नीचांकी धावसंख्येनंतर पुनरागमन करताना दुसऱ्या कसोटीत विजय साकारला. यापूर्वी १८८७ मध्ये इंग्लंडने अशी कामगिरी केली होती. सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने ७० धावांचे लक्ष्य देत २ बळी घेतले होते. मंगळवारी चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ६ बाद १३३ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. संघाचा डाव २०० धावांवर संपुष्टात आला. भारताने पहिल्या डावात ३२६ धावा उभारल्या. ७० धावांच्या प्रत्युत्तरात शुभमान गिल (३५*) व अजिंक्य रहाणेने (२७*) विजय मिळवून दिला.

काेच शास्त्रींचा टीमवर कौतुकाचा वर्षाव; मेलबर्नमध्ये दमदार पुनरागमन

भारतीय संघाने आता मेलबर्नमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून दमदार पुनरागमन केले आहे. टीमची हीच खेळी कौतुकास्पद ठरलेली आहे. त्यामुळे टीमला जगातील सर्वात चांगले पुनरागमन नोंदवता आले, अशा शब्दात काेच रवी शास्त्री यांनी टीमवर कौतुकाचा वर्षाव केला. सलामीला ३६ धावांवर बाद झाल्यानंतर संघावर टीका होत होती. आता विराट कोहली, सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर या सर्वांनी संघाच्या कामगिरीचे कौतुक केले

दोन्ही संघातील १०० वी कसोटी :

भारत व ऑस्ट्रेलिया संघातील ही १०० वी कसोटी होती. भारताने २९ व ऑस्ट्रेलियाने ४३ सामन्यांत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियामधील दोन्ही संघातील हा ५० वा सामना होता.

बातम्या आणखी आहेत...