आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गंभीर दुखापतीने त्रस्त असतानाही टीम इंडियाच्या यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या (९७) तुफानी फटकेबाजीपाठाेपाठ अार.अश्विन (३९)व विहारीच्या (२३) हनुमानाच्या लांब शेपटीसारख्या चिवट मॅरेथाॅन खेळीने अाॅस्ट्रेलियाची मालिका विजयासाठीची मेहनत धुळीस मिळाली. या दाेघांच्या २५९ चेंडूंत साडेतीन तासांतील चिवट खेळीतून केलेल्या अर्धशतकी भागीदारीच्या बळावर भारताने साेमवारी तिसरी कसाेटी अनिर्णीत ठेवली. अाॅस्ट्रेलियाने दिलेल्या ४०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने पाचव्या दिवशी ५ बाद ३३४ धावा काढल्याने कसाेटी ड्राॅ झाली. शेवटची चाैथी कसाेटी शुक्रवारपासून रंगणार अाहे.
दुसऱ्या डावात ७८६ चेंडू भारतीय खेळाडू खेळले
पाचव्या दिवशी ऋषभ पंतपाठाेपाठ हनुमा विहारी व फिरकीपटू अश्विनच्या चिवट खेळीने कलाटणी बसली. त्यामुळे भारतीय संघाच्या नावे चिवट खेळीतून विक्रमाची नाेंद झाली. भारताने दुसऱ्या डावात १३१ षटके म्हणजेच ७८६ चेंडू खेळून कसाेटी अनिर्णीत ठेवली. यातून भारतीय संघ हा ५७ वर्षांनंतर सर्वात चिवट खेळी करणारा संघ ठरला. यापूर्वी १९६४ मध्ये दक्षिण अाफ्रिका संघाने ९३६ चेंडू खेळून सामना ड्रॉ केला हाेता.
हनुमा विहारीची फलंदाजाच्या भूमिकेत १४ वर्षांतील सर्वात संथ खेळी : हनुमा विहारीने १६१ चेंडूंचा सामना करताना २३ धावा काढल्या. त्याने १४.२८ च्या सरासरीने ही खेळी केली. भारतीय फलंदाजाच्या भूमिकेतील हनुमा विहारीची ही १४ वर्षांतील सर्वात संथ खेळी ठरली. १०० पेक्षा अधिक चेंडू खेळून शेवटची चिवट खेळी बर्थडे बाॅय राहुल द्रविडने २००७ मध्ये केल्याची नाेंद अाहे. त्याने मेलबर्न कसाेटीत अाॅस्ट्रेलियाविरुद्ध ११४ चेंडूंत १४.०३ च्या सरासरीने १६ धावा काढल्या हाेत्या.
४ सुपरस्टार: १३१ पैकी १०२ षटके खेळले
चेतेश्वर पुजारा (चेंडू २०५), हनुमा विहारी (१६८), अश्विन (१२८) अाणि ऋषभ पंत (११८) यांनी दुसऱ्या डावात १३१ पैकी १०२ षटके खेळली अाहेत. पुजाराने अाठव्यांदा अाॅस्ट्रेलियाविरुद्ध २०० पेक्षा अधिक चेंडूंचा सामना केला. यासह त्याने यात गावसकरांच्या विक्रमाशी बराेबरी साधली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.