आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शेवटच्या वनडे सामन्यातील विजयाने ट्रॅकवर आलेला भारतीय संघ आता टी-२० मालिकेत सलामी देण्यासाठी उत्सुक आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात हाेणार आहे. मालिकेतील सलामी सामना आज शुक्रवारी मनुका आेव्हलवर रंगणार आहे. या मैदानावर भारताने शेवटचा तिसरा वनडे सामना बुधवारी जिंकला. आता याच मैदानावर भारतीय संघ टी-२० च्या फाॅरमॅटमध्ये विजयाचे खाते उघडण्यासाठी सज्ज झाला आहे. यातून भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दाेन्ही संघ पुढच्या वर्षीच्या टी-२० विश्वचषकाची तयारी करणार आहे. या मालिकेत उल्लेखनीय कामगिरी करण्यावर दाेन्ही टीमचा भर असेल. वनडे मालिका पराभवातून सावरलेला भारतीय संघ आता या फाॅरमॅटच्या सिरीजमध्ये सरस खेळी करण्यासाठी सज्ज आहे. वनडे मालिका विजयाने ऑस्ट्रेलियन टीम फाॅर्मात आहे. त्यामुळे टीमची नजर आता सलग दुसऱ्या मालिका विजयावर आाहे.
लाेकेश राहुलला सलामीची संधी :
मर्यादित षटकांच्या सामन्यात पाचव्या स्थानावरून फलंदाजीसाठी येणाऱ्या युवा खेळाडू लाेकेश राहुलला आता टी-२० मालिकेत सलामीची संधी मिळेल. त्याची या झटपट क्रिकेटच्या फाॅरमॅटमधील कामगिरी आतापर्यंत लक्षवेधी ठरलेली आहे. त्यामुळे याच उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर टीम इंडिया मालिका विजयाचे लक्ष्य गाठण्यासाठी उत्सुक आहे. दुसरीकडे लाेकेश राहुलने यंदा सत्राच्या सुरुवातीला जानेवारीत न्यूझीलंड दाैऱ्यावर तुफान फटकेबाजी केली हाेती.
चहलची संघात एन्ट्री; नटराजनचे पदार्पण
गाेलंदाजीमध्ये टी. नटराजनला संधी मिळेल. यातून त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करण्याची संधी आहे. त्याची तिसऱ्या वनडे सामन्यातही कामगिरी काैतुकास्पद ठरलेली आहे. त्याने १० षटकांत दाेन गडी बाद करण्याचा पराक्रम गाजवला. याचदरम्यान जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. यात युजवेंद्र चहलचे पुनरागमन हाेण्याचे चित्र आहे. याशिवाय संजु सॅमसनलाही संधी मिळण्याचे चित्र आहे. त्यामुळे ही फळी मजबूत हाेत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.