आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका १७ डिसेंबरपासून अॅडिलेडमध्ये सुरू होत आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर पहिल्या कसोटीत खेळणार नाही. वॉर्नरने म्हटले की, ‘मला पूर्वीपेक्षा चांगले वाटत आहे. त्यावर मी सिडनीमध्येच राहून फिटनेसवर काम करू इच्छितो, पण मला धावताना त्रास होतोय.’ संघाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर म्हणाले की, ‘वॉर्नर दुखापतीतून सावरत आहे. मला अशा वाटते, तो दुसऱ्या कसोटीपूर्वी तंदुरुस्त होईल.’ भारत अ संघाविरुद्ध सराव सामन्यादरम्यान पुकोवस्कीच्या डोक्याला चेंडू लागला. त्यामुळे ११ डिसेंबरपासून होणाऱ्या दुसऱ्या सराव सामन्यातून तो बाहेर झाला. त्याचे पहिल्या कसोटीत खेळणे शक्य नाही. बर्न्ससोबत शॉन मार्शला सलामीवीर म्हणून संधी मिळू शकते. यादरम्यान ११ डिसेंबरपासून भारत अ विरुद्ध गुलाबी चेंडूवर होणाऱ्या तीनदिवसीय सराव सामन्यात ऑस्ट्रेलिया अ संघाकडून अष्टपैलू कॅमरून ग्रीन व लेगस्पिनर मिचेल स्वेप्सनला संधी दिली जाऊ शकते. पहिल्या सराव सामन्यात ग्रीनने शतक ठोकले होते. तर, स्वेप्सनने टी-२० मालिकेत शानदार गोलंदाजी केली होती.
कमी गतीच्या षटकामुळे भारताला दंड
आयसीसीचे सामना रेफरी डेव्हिड बूनने भारतीय संघाला अखेरच्या टी-२० सामन्यात षटकांची गती कमी ठेवल्याने दोषी ठरवले. बूनने म्हटले, संघाने निर्धारित वेळेत एक षटक कमी टाकले. आयसीसीच्या नियमाने त्यांना दंड लावला. यापूर्वी वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात षटकांची गती कमी ठेवल्याने संघाला दंड ठोठावला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.