आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मिशन मेलबर्न:36 धावांत खुर्दा : कर्णधार काेहली-प्रशिक्षक शास्त्रींनी रात्री 12.30 वाजता आखला प्लॅन; जडेजाची निवड

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मालिका विजयाची माेहीम झाली फत्ते

यजमान ऑस्ट्रेलियाने सलामीच्या कसाेटीत अवघ्या ३६ धावांत भारतीय संघाचा धुव्वा उडवला आणि दणदणीत विजय संपादन केला. याच लाजिरवाण्या पराभवानंतर रात्री १२.३० वाजेच्या सुमारास टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यात चिंतन बैठक झाली. या बैठकीत मालिकेतील उर्वरित तीन कसाेटी सामन्यांसाठीचे प्रभावशाली असे डावपेच आखण्यात आले. काेहलीच्या अनुपस्थितीत आॅलराउंडर रवींद्र जडेजाचे दुसऱ्या कसाेटीसाठी भारतीय संघातील स्थान निश्चित करण्यात आले. हीच प्लॅनिंग अधिक यशस्वी ठरली. जडेजाने विश्वास सार्थकी लावताना दुसऱ्या कसाेटीत तीन विकेट घेतल्या. याशिवाय अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे टीमने विजय संपादन करून मालिकेत बराेबरी साधली हाेती.

यजमान ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध सलामी सामन्यातील मानहानीकारक खेळीने टीम इंडियाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. ऑस्ट्रेलियासमाेर अवघ्या ३६ धावांत भारतीय संघाने घातलेल्या लाेटांगणाची जाेरदार चर्चा झाली. यादरम्यान अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी संघासह नेतृत्व करणाऱ्या काेहलीवर प्रचंड टीका केली. याशिवाय ही मालिका टीम इंडिया ०-४ ने गमावण्याचे भाकीतही वर्तवले हाेते. मात्र, त्यानंतर दमदार पुनरागमन करताना टीम इंडियाने रहाणेच्या नेतृत्वात थेट २-१ ने मालिका विजय संपादन केला. याशिवाय गाबाच्या मैदानावर ऐतिहासिक विजयाची नाेंद केली. यादरम्यान आर.अश्विनने फील्डिंग काेच श्रीधर यांच्याशी चर्चा केली. त्याचाच मुख्य भाग.

प्रकरण : टीमचा सलामीला पराभव झाला. काेहली लीव्हवर मायदेशी परतला. जायबंदी शमी संघाबाहेर हाेता. अशात टीमला माेठा निर्णय घ्यावा लागला.
अश्विन :
मी आता घरी जात आहे. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रत्येक कसाेटी सामन्यात खेळी करा, अशा शब्दांत काेहलीने आम्हा सर्व सहकाऱ्यांशी संवाद साधला. त्यामुळे सर्व जण खुश हाेते.

काेच श्रीधर : रात्रीचे १२.३० वाजले हाेते. याचदरम्यान मला कर्णधार विराट काेहलीचा मेसेज आला. एवढ्या रात्री काय करत आहात, असा मेसेज पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर मी त्या ठिकाणी आलाे. काेच रवी शास्त्री, बाॅलिंग काेच भरत अरुण, बॅटिंग काेच विक्रम राठाैर आणि मी, अशी बैठक झाली. यादरम्यान आम्ही सर्वांनी मिळून मिशन मेलबर्नसाठीची प्लॅनिंग आखली. दुसऱ्या दिवशी सकाळच्या बैठकीत मी काेहलीसाेबत रहाणेलाही सहभागी करून घेतले. यादरम्यान सखाेल चर्चा झाली. ३६ धावांत खुर्दा पडल्याने फलंदाजी मजबूतीची चर्चा हाेती. अशात काेहलीने गाेलंदाजीसाठी जडेजाच्या नावावर शिक्कामाेर्तब केले. हाच निर्णय महत्त्वाचा ठरला. याशिवाय जडेजानेही गाेलंदाजी व फलंदाजीही सरस खेळी केली.

प्रकरण : मेलबर्नमध्ये दाखल झालेला भारतीय संघ निराश हाेता. त्यामुळे काेच अरुण यांनी सर्वांची बैठक बाेलावली आणि सराव रद्द करण्याचा निर्णय घेतला.
अश्विन : ट्रेनिंग सेशन रद्द करण्यामागे काेणते कारण हाेते ?
श्रीधर
: हा सर्वस्वी निर्णय भरत अरुण यांचा हाेता. सरावादरम्यान अधिक विचार केल्याने खेळाडूंच्या मनावरील दबाव अधिक वाढेल आणि त्याचा विपरीत परिणाम पुढच्या कसाेटीतील खेळण्यावर होईल. त्यामुळे सर्वच खेळाडूंना एका दिवसाची सुटी देण्यात आली. दिवसभर विश्रांती घेतलेल्या खेळाडूंसाठी आम्ही रात्रीच्या वेळी एकत्र डिनरची व्यवस्था केली. यादरम्यान डिनरसाठी सर्वच जण एकत्र आले. यातून आम्ही सर्वांशी सकारात्मक अशी चर्चा केली. याशिवाय आम्ही याच वेळी विनाेदावरही अधिक भर दिला. त्यामुुळे खेळाडूंच्या मनावरील ताण दूर हाेण्यास मदत झाली. याशिवाय खेळाडूंही अधिक खुश हाेते. अशाच परिस्थितीतमध्ये आम्ही या गंभीर गाेष्टीची जाण सर्वच खेळाडूंना करून दिली. त्यानंतर आखलेल्या डावपेचानुसारच सर्वांनीच चांगली कामगिरी केली. यातून विजय साकारून बराेबरी साधली.

चेंडू कुठेही लागू देत, बाद व्हायचे नाही : पुजारला सल्ला
सिडनी येथील तिसऱ्या कसाेटीच्या शेवटच्या दिवशी टीम इंडियाला ९० षटकांचा सामना करायचा हाेता. हातात ८ विकेट शिल्लक हाेत्या. सर्वांनाच टिकून खेळण्याची गरज हाेती. या वेळी मी स्वत: पुजाराला एक सल्ला दिला. चेंडू कुठेही लागू देत. मात्र, बाद हाेऊ देऊ नकाेस. हाच सल्ला त्याने तंताेतत अमलात आणला. यातून त्याने थेट २०० चेंडूंचा सामना करत आपले पाय राेवून ठेवले.

बातम्या आणखी आहेत...