आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट:आज भारत-बांगलादेश सामना

चितगांव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुमार गाेलंदाजी आणि जायबंदी खेळाडूंच्या वाढत्या संख्येने भारतीय संघ अडचणीत सापडला आहे. त्यामुळे भारतीय संघावरील आता तिसऱ्या वनडे सामन्यातील पराभवाचे सावट कायम आहे. मालिका विजयाने फाॅर्मात असलेला यजमान बांगलादेश संघ आता सलग तिसरा वनडे सामना जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारत आणि यजमान बांगलादेश यांच्यात शनिवारी मालिकेतील शेवटचा तिसरा वनडे सामना हाेणार आहे. सलगचे दाेन सामने जिंकून बांगलादेश संघाने या वनडे मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. आता यजमान टीमची नजर मालिकेत विजयी हॅट््ट्रिक साजरी करण्यावर लागली आहे. टीम इंडिया आता शेवट गाेड करण्यासाठी उत्सुक आहे.

बातम्या आणखी आहेत...