आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ऋषिकेश कानिटकर यांची भारतीय महिला संघाच्या फलंदाजी (बॅटिंग कोच) प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
तर संघाचे मुख्य प्रशिक्षक रमेश पवार यांना राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) पाठवण्यात आले आहे. तो बंगळुरूमध्ये व्हीव्हीएस लक्ष्मणसोबत काम करणार आहे. बीसीसीआयने मंगळवारी सांगितले की, ऋषिकेश 9 डिसेंबरपासून मुंबईत सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या T20I मालिकेपूर्वी संघात सामील होतील.
भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर 48 वर्षीय माजी क्रिकेटपटू कानिटकर म्हणाले की, राष्ट्रीय महिला संघाचा फलंदाजी प्रशिक्षक बनणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मला या संघात प्रचंड क्षमता दिसत आहे. आमच्याकडे युवा आणि अनुभव यांचा चांगला मिलाफ आहे. हा संघ पुढील आव्हानासाठी सज्ज आहे. काही मोठ्या स्पर्धा येत आहेत आणि संघासह फलंदाजी प्रशिक्षक म्हणून माझ्यासाठी ते रोमांचक असणार आहे.
त्याचवेळी महिला संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रमेश पवार म्हणाले की, 'वरिष्ठ महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून माझा अनुभव चांगला आहे. गेल्या काही वर्षांत मी देशातील काही दिग्गज आणि नवोदित प्रतिभांवान खेळांडूसोबत काम केले आहे. NCA मधील माझ्या नवीन भूमिकेतील माझ्या अनेक वर्षांच्या अनुभवाच्या आधारे मी उत्सुक आहे. बेंच स्ट्रेंथ विकसित करण्यासाठी व्हीव्हीएस लक्ष्मणसोबत काम करण्यास उत्सुक आहे.
अखेरच्या षटकात चौकार मारून भारताने रौप्य महोत्सवी चषक जिंकला
कानिटकर यांनी 1998 मध्ये भारतासाठी रौप्य महोत्सवी चषक जिंकला. अंतिम सामन्याच्या शेवटच्या षटकात त्याने पाकिस्तानच्या सकलेन मुश्ताकवर चौकार मारला. टीम इंडियाला शेवटच्या 2 चेंडूत 3 धावांची गरज होती. भारताने हा सामना 3 विकेटने जिंकला होता. कानिटकरशिवाय सौरव गांगुलीने (124) शतक झळकावले. ढाका स्टेडियमवर फलंदाजी करताना पाकिस्तानने 314 धावा केल्या होत्या. जे भारताने 7 विकेट्स गमावून पूर्ण केले. तर भारत पाक फायनलमध्ये कानिटकर यांनी 12 चेंडूत 11 धावा केल्या.
कोची टस्कर्सचे सहाय्यक प्रशिक्षक, वादामुळे राजीनामा
2011 मध्ये, कानिटकर यांची आयपीएल संघ कोची टस्कर्सचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, परंतु हंगाम सुरू होण्यापूर्वी वादामुळे त्यांना काढून टाकण्यात आले. यानंतर, ते 2015-16 मध्ये गोवा रणजी संघाचे मुख्य प्रशिक्षक झाले. त्यानंतर 2016-2019 पर्यंत त्यांनी प्रशिक्षक म्हणून तामिळनाडू क्रिकेट संघाचे नेतृत्व केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.