आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारतीय संघाने ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या लढतीत इंग्लंडला ६६ धावांनी हरवले. एकदिवसीयमध्ये सलग ३ सामने गमावल्यानंतर भारताने हा विजय मिळवला.
इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनने पुन्हा एकदात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. टी-२० मालिकेतील अखेरच्या २ सामन्यांत त्याने प्रथम गोलंदाजी घेतली होती व संघ पराभूत झाला होता. रोहित-धवनच्या जोडीने पहिल्या गड्यासाठी ९१ चेंडूत ६४ धावांची सलामी दिली. रोहित (२८) धावांवर तंबूत परतल्यानंतर कोहली व धवनने १०५ धावांची भागीदारी केली. विराट कोहली पुन्हा एकदा अर्धशतकाला शतकात बदलू शकला नाही व ५६ धावांवर तो परतला. धवन (९८) पाचव्यांदा नर्व्हस नाइंटीवर बाद झाला. कृणाल व राहुलने अखेरच्या ५७ चेंडूंत ११२ धावा ठोकल्या. राहुलने वनडेमधील १० वे व कृणालने पहिले अर्धशतक झळकावले. कृणाल पदार्पणाच्या सामन्यात ५०+ धावा करणारा १५ वा खेळाडू बनला. इंग्लंडसाठी स्टोक्सने ३ व वूडने २ बळी घेतले. प्रत्युत्तरात, रॉय व बेयरस्टो जोडीने स्फोटक सुरुवात करत ८६ चेंडूंत १३५ धावांची सलामी दिली. पदार्पण करणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाने रॉयला (६४) बाद केले. त्यानंतर इंग्लंडचा डाव गडगडला. इतर फलंदाजांनी निराशा केली. बेयरस्टोने ९४ व मोइन अलीने ३० धावा केल्या. प्रसिद्ध कृष्णाने ४, शार्दूल ठाकूरनेे ३ व भुवनेश्वरने २ बळी घेतले.
प्रसिद्धकडे वेग-उसळी दोन्ही, भारताकडे जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांची फळी
ठीक एक वर्षापूर्वी, कर्णधार कोहलीने म्हटले होते की, टी-२० विश्वचषकासाठी एका एक्स फॅक्टर गोलंदाजाची गरज आहे. त्याने गोलंदाजाचे नाव प्रसिद्ध कृष्णा म्हटले होते. कर्नाटकच्या या वेगवान गोलंदाजाकडे वेग व उसळी दोन्ही आहेत. इंग्लंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात आपण पाहिले की प्रसिद्धला कर्णधाराने पसंती का दिली. त्याने पहिल्या स्पेलमध्ये थोड्या धावा दिल्या. त्यानंतर जोरदार पुनरागमन केले. तो फलंदाजांना आपल्या उसळीने अडचणीत आणू शकतो. तो कर्णधाराला गरज असताना कामी आला. तो फलंदाजांना खेळण्यास भाग पाडतो. तो इतर गोलंदाजांपेक्षा वेगळा आहे. भुवनेश्वर नेहमीप्रमाणे अचूक ठरला. शार्दूलने आपल्या गतीत बदल केला. नटराजन आपल्या पिन पॉइंट यॉर्करने फलंदाजांना चकवतो. दीपक चाहर, सैनी, बुमराह, शमी, उमेश व ईशांतदेखील आहेत. भारतीय क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारासाठी वेगवान गोलंदाजांची उत्कृष्ट फळी तयार आहे. - चंद्रेश नारायणन, दिव्य मराठी तज्ज्ञ
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.