आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
इंग्लंड क्रिकेट संघ पुढच्या वर्षी भारत दाैरा करणार आहे. या दाैऱ्यावर इंग्लंड आणि भारत यांच्यात चार कसाेटी, तीन वनडे आणि पाच टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. यासाठी इंग्लंडचा संघ २७ जानेवारी राेजी चेन्नईत दाखल हाेईल. येथील मैदानावर ५ फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसाेटी मालिकेला सुरुवात हाेईल. येथेच दुसरी कसाेटी हाेईल.
अहमदनाबाद येथील जगातील सर्वात माेठ्या माेटेरा स्टेडियमवर यजमान भारत आणि इंग्लंड संघ दाेन कसाेटी सामने खेळणार आहे. याशिवाय याच मैदानावर दाेन कसाेटीसह पाच टी-२० असे एकूण सात सामने हाेतील. १ लाख २० हजार प्रेक्षक क्षमता असलेले हे स्टेडियम जगातील सर्वात माेेठे मानले जाते. त्यानंतर वनडे मालिका पुण्यातील मैदानावर हाेईल. दाेन वर्षानंतर पुण्यामध्ये मर्यादित षटकांच्या सामन्यांची मालिका हाेणार आहे.
प्रेक्षक प्रवेशाचा निर्णय लांबणीवर :
भारत व इंग्लंड कसाेटी सामन्यादरम्यान प्रेक्षकांना प्रवेश द्यायचा की नाही, याबाबत चर्चा सुरू आहे. यावर लवकरच निर्णय घेतला जाईल.
दाेन वर्षांनंतर पुण्यात वनडे सिरीज
पुण्यातील स्टेडियमवर भारत व इंग्लंड वनडे मालिका रंगणार आहे. २३ मार्चला सलामीचा सामना हाेईल. त्यानंतर २६ आणि २८ मार्च राेजी या मैदानावर सामने हाेतील. २०१८ नंतर पहिल्यांदा पुण्यात वनडे मालिका हाेईल.
बाॅक्सिंग डे कसाेटी: प्रेक्षकांना प्रवेश
भारत व आॅस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी कसाेटी २६ डिसेंबरपासून सुरू हाेईल. याच बाॅक्सिंग डे कसाेटीदरम्यान मेलबर्न स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश दिला जाईल. यातून ३० हजार प्रेक्षकांना या कसाेटीचा आनंद लुटता येईल.
कसाेटी मालिकेचे वेळापत्रक
दिनांक सामने मैदान
५-९ फेब्रुवारी पहिली कसाेटी चेन्नई
१३-१७ फेब्रुवारी दुसरी कसाेटी चेन्नई
२४-२८ फेब्रुवारी तिसरी टेस्ट अहमदाबाद
४-८ मार्च चाैथी कसाेटी अहमदाबाद
टी- 20 सामने अहमदाबादमध्ये
दिनांक सामने
१२ मार्च पहिली लढत
१५ मार्च दुसरी लढत
१६ मार्च तिसरी लढत
१८ मार्च चाैथी लढत
२० मार्च पाचवी लढत
वनडे सर्व सामने पुण्यात रंगणार
दिनांक सामने
२३ मार्च पहिला वनडे
२६ मार्च दुसरा वनडे
२८ मार्च तिसरा वनडे
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.