आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डे-नाइट कसोटी:वेगवान गोलंदाज वरचढ; बुमराह, उमेश यादवचे पुनरागमन हाेणार, तिसरी कसोटी आजपासून रंगणार

अहमदाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • टेस्ट चॅम्पियनशिपमधील आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताची धडप

दुसऱ्या कसोटीतील विजयाने आत्मविश्वास द्विगुणित झालेला यजमान भारतीय संघ आता अहमदाबादच्या माेेटेरा स्टेडियमवर लख्ख प्रकाशझाेतात चमकदार कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे. येथील तिसरी कसोटी जिंकण्याच्या इराद्याने टीम इंडिया या मैदानावर उतरणार आहे. टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील डे-नाइट कसोटीला आज बुधवारपासून सुरुवात हाेईल. प्रत्येकी एका विजयासह दोन्ही संघांनी चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. आता तिसऱ्या कसोटीत बाजी मारून आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघांची धडपड आहे.

अहमदाबाद येथील डे-नाइट कसोटीमध्ये सरस खेळी करण्याची टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांना माेठी संधी आहे. कारण, डे-नाइट कसोटीमध्ये आतापर्यंत वेगवान गोलंदाज वरचढ ठरलेले आहेत. त्यामुळे भारतीय संघ आपल्या हुकमी एक्के वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि उमेश यादवला संधी देण्याची शक्यता आहे. याच्या बळावर टीम इंडियाला सलग दुसऱ्यांदा विजयाची पताका फडकवता येईल.

दुसरीकडे सलामीवीर फलंदाजांकडून भारतीय संघाला मोठ्या खेळीची आशा आहे. गत ३२ डावांत सलामीच्या जाेडीला फक्त तीन वेळा अर्धशतकी भागीदारी करता आली.

आर. अश्विन करणार ४०० बळी पूर्ण
टीम इंडियाचा फिरकीपटू आर. अश्विनकडून आता पुन्हा एकदा अष्टपैलू कामगिरीची आशा केली जात आहे. याशिवाय त्याला कसोटीत ४०० बळी पूर्ण करण्याची संधी आहे. त्याला अवघ्या सहा विकेट आवश्यक आहेत. आता ७६ कसोटींत त्याच्या नावे ३९४ बळींची नाेंद आहे. यातून ४०० बळी पूर्ण करणारा अश्विन हा मुरलीधरननंतर दुसरा गोलंदाज ठरणार आहे.

कर्णधार काेहली टाकणार पाँटिंगला मागे
टीम इंडियाच्या कर्णधार विराट कोहलीला कसोटीत शतक साजरे करण्याची संधी आहे. यातून ताे कर्णधाराच्या भूमिकेत ४२ वे शतक साजरे करू शकेल. याच कामगिरीतून ताे रिकी पाँटिंगला मागे टाकेल. कारण, या दाेघांच्या नावे कर्णधाराच्या भूमिकेत प्रत्येकी ४१ कसोटी शतकांची नाेंद आहे. त्यामुळे आता एका शतकाने त्याला आघाडी घेता येईल.

ईशांत शर्मा शतकी कसोटी खेळणे, कौतुकास्पद यश
अहमदाबादच्या माेटेरा स्टेडियमवरील कसाेटी ही टीम इंडियाच्या गोलंदाज कसोटी शर्मासाठी विक्रमाचा पल्ला गाठून देणारी आहे. त्याच्या करिअरमधील ही १०० वी कसोटी आहे. यासाठी मैदानावर उतरल्यानंतर ईशांत हा १०० कसोटी खेळणाऱ्या एलिट क्लबमध्ये सहभागी हाेणार आहे. अशा प्रकारे १०० वी कसोटी खेळणे, हे खऱ्या अर्थाने ईशांत शर्माचे कौतुकास्पद यश मानले जाते. यासाठी चमकदार कामगिरीमध्ये सातत्य आणि फिटनेसची भूमिका महत्त्वाची मानली जाते. याच्या बळावरच त्याने हा माेठा पल्ला गाठला. त्याने बांगलादेश संघाविरुद्ध कसोटीतून करिअरला सुरुवात केली. मुनाफ पटेलच्या जागी ईशांतला मिळालेली संधी ही काहीशी वादाच्या भोवऱ्यात सापडली हाेती. त्यामुळे शेवटच्या क्षणाला त्याला दक्षिण आफ्रिका दाैऱ्यातून वगळण्यात आले. कारण, यादरम्यान अनेक सीनियर खेळाडूंनी ईशांतच्या निवडीवर टीका केली. मात्र, त्यानंतर ईशांत शर्माने २००८ पर्थ कसोटीत उल्लेखनीय कामगिरीतून त्याने याच टीकाकारांची ताेंडे बंद केली. यातून त्याला आतापर्यंत वर्चस्व गाजवता आले. ताे सातत्याने स्वत:ला सिद्ध करत आला.

बातम्या आणखी आहेत...