आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट:मालिका विजयासाठी भारत-इंग्लंड आज निर्णायक लढतीत समाेरासमाेर

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारत- इंग्लंड आज तिसरा निर्णायक वनडे सामना

यजमान टीम इंडिया आता पुण्यातील मैदानावर मालिका विजयाची धुळवड साजरी करण्यासाठी सज्ज आहे. मालिका विजयाच्या इराद्याने भारतीय संघ आज रविवारी मैदानावर उतरणार आहे. भारत-इंग्लंड यांच्यात आज निर्णायक आणि शेवटचा तिसरा वनडे सामना हाेणार आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी एका शानदार विजयाच्या बळावर तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरी साधली आहे. त्यामुळे आता पुण्यातील एमसीएच्या मैदानावर हाेणारा हा सामना दोन्ही टीमसाठी निर्णायक आहे. गत सामन्यात बाजी मारून इंग्लंड संघ विजयी ट्रॅकवर आला आहे. त्यामुळे आता या निर्णायक लढतीतही सरस खेळी करून टीम इंडियाचा मालिका विजयाचा प्रयत्न हाणून पाडण्याचा इंग्लंड संघाचा मानस आहे. सध्या बेन स्टाेक्ससह जाॅनी बेअरस्टाे गत सामन्यातील फटकेबाजीमुळे फाॅर्मात आले आहेत.

यजमान टीम इंडियाची नजर गत दाेन द्विपक्षीय वनडे मालिकेपासूनची पराभवाची मालिका खंडित करण्यावर लागली आहे. भारतीय संघाला गत दाेन मालिकांदरम्यान पराभवाचा सामना करावा लागला हाेता. यापूर्वी १९९६-९७ मध्ये भारतीय संघाला सलग तीन वा त्यापेक्षा अधिक द्विपक्षीय वनडे मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले हाेते. त्यामुळे आता मालिका विजयाने या रेकॉर्डमध्ये सुधारणा करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.

चहल, टी.नटराजनला मिळेल संधी
दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडला पराभूत करून मालिका विजय संपादन करण्याचे टीम इंडियाचे डावपेच हाेते. मात्र, फिरकीच्या अपयशाचा माेठा फटका टीम इंडियाला बसला. कुलदीप यादव आणि कृणाल पांड्याने १६ षटके टाकताना १५६ धावा दिल्या. त्यामुळे इंग्लंडच्या विजयाचा मार्ग अधिकच सुकर झाला. त्यामुळे आता निर्णायक तिसऱ्या वनडे सामन्यात या दोघांना विश्रांती देऊन युजवेंद्र चहल आणि टी.नटराजनला संधी देण्याचा टीम इंडिया निर्णय घेण्याचे चित्र आहे.

पाॅवर प्लेमध्ये इंग्लंड संघ पाॅवरफुल
पाॅवर प्लेमध्ये टीम इंडियाला समाधानकारक अशी कामगिरी करता आली नाही. त्या तुलनेमध्ये इंग्लंडचा संघ यादरम्यान अधिक पाॅवरफुल असल्याचे सिद्ध झाले. भारतीय संघाने सलामी आणि दुसऱ्या वनडे सामन्यातील पाॅवर प्लेमध्ये अनुक्रमे ३९ व ४१ धावा काढल्या. दुसरीकडे याचदरम्यान इंग्लंड टीमच्या अनुक्रमे ८९ व ५९ धावा हाेत्या. यादरम्यान टीम इंडियाने तीन विकेट गमावल्या. मात्र, इंग्लंड टीमचा एकही फलंदाज यादरम्यान बाद झाला नाही.

बातम्या आणखी आहेत...