आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Pakistan Beat India In ICC ODI Rankings, Team India Could Not Play 4 Months ODI, Slipped To Fifth Position, New Zealand Tops

ICC वनडे रॅंकिंगमध्ये टीम इंडिया 5 व्या स्थानी:पाकिस्तानने भारताला टाकले मागे, टीम इंडिया खेळू शकली नाही 4 महिने वनडे, न्यूझीलंड अव्वल

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ताज्या ICC एकदिवसीय क्रमवारीत पाकिस्तानने भारताला मागे टाकले आहे. पाकिस्तानच्या संघाने अलीकडेच वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या वनडे मालिकेत क्लीन स्वीप केल्यानंतर हा टप्पा गाठला आहे. जागतिक क्रमवारीत भारत आता पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.

ताज्या ICC एकदिवसीय क्रमवारीत पाकिस्तान 102 गुणावरून वरून 106 अंकांवर गेला आहे. त्यामुळे तो पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. तर भारताचे 105 गुण आहेत.

टीम इंडिया बऱ्याच दिवसांपासून एकदिवसीय मालिका खेळत नाहीये. त्यामुळे टीम इंडिया चौथ्या क्रमांकावरून पाचव्या स्थानावर घसरली. दुसरीकडे, न्यूझीलंडचा संघ अव्वल, तर इंग्लंड दुसऱ्या आणि ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे.

भारताला मागे सोडण्यासाठी तिन्ही सामने जिंकणे आवश्यक होते.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या 3 सामन्यांच्या घरच्या मालिकेपूर्वी पाकिस्तानचे 102 गुण होते. भारताला मागे सोडण्यासाठी त्याला वेस्ट इंडिजविरुद्ध 3 सामने जिंकणे आवश्यक होते. पाकिस्ताननेही वेस्ट इंडिजविरुद्धची मायदेशातील मालिका 3-0अशी जिंकली. यासह त्याचे 106 गुण झाले. भारत 11 फेब्रुवारी 2022 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला.

भारताला महिन्याभरात पाकला मागे टाकण्याची आहे संधी

भारताला एका महिन्यात एकदिवसीय क्रमवारीत पाकिस्तानला मागे टाकण्याची संधी आहे. कारण पाकिस्तानला आता ऑगस्टमध्ये नेदरलँड्सविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. त्याचबरोबर टीम इंडियाला 12 जुलै ते 17 जुलै दरम्यान इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. त्यानंतर 22 ते 27 जुलै या कालावधीत वेस्ट इंडिज दौऱ्यावर वेस्ट इंडिजविरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...