आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाचा टी-20 मध्ये सलग 7 वा विजय:पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा केला 6 गडी राखून पराभव, व्यंकटेश अय्यरने ठोकला विजयी षटकार

कोलकाता6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाने पहिल्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 विकेट्सने पराभव केला आहे. या सामन्यात भारतासमोर 158 धावांचे लक्ष्य होते, जे संघाने 18.5 षटकांत 6 गडी राखून पूर्ण केले. रोहित शर्माने (40) विजयात सर्वाधिक धावा केल्या, तर सूर्यकुमार यादवने नाबाद 34 धावा केल्या. या फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा हा सलग सातवा विजय आहे.

तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम खेळताना वेस्ट इंडिजने 157/7 धावा केल्या होत्या. निकोलस पूरनने सर्वाधिक 61 धावा केल्या. भारताकडून रवी बिश्नोई आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या, तर भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल आणि दीपक चहर यांनी 1-1 बळी घेतले.

सामन्याचा लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा..

वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना मोठी खेळी करण्यात अपयश

वेस्ट इंडिजची सुरुवात चांगली झाली नाही. ब्रँडन किंगला भुवनेश्वर कुमारने पहिल्याच षटकात सूर्यकुमार यादवच्या हाती झेलबाद केले. सातव्या षटकातील पाचव्या चेंडूवर युझवेंद्र चहलने काइल मेयर्सला (31) एलबीडब्ल्यू बाद केले. रवी विश्‍वनोईने 11व्या षटकात रुस्टन चेसला एलबीडब्ल्यू आऊट करून भारताला तिसरे यश मिळवून दिले. विश्नोई आपला पदार्पण सामना खेळत असून त्याची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय विकेट आहे. त्याच षटकातील पाचव्या चेंडूवर त्याने रोव्हमन पॉवेललाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

दीपक चहरने 14व्या षटकात अकिल हुसेनची विकेट घेतली. निकोलस पूरन 43 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 61 धावा करून हर्षल पटेलचा बळी ठरला. पूरनने आपल्या टी-20 कारकिर्दीतील सहावे आणि भारताविरुद्ध दुसरे अर्धशतक ठोकले आहे.

सामन्याच्या पहिल्याच षटकात भुवनेश्वर कुमारने वेस्ट इंडिजला धक्का दिला.
सामन्याच्या पहिल्याच षटकात भुवनेश्वर कुमारने वेस्ट इंडिजला धक्का दिला.

भारताकडून लेगस्पिनर रवी बिश्नोईला टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. या फॉरमॅटमध्ये खेळणारा तो 95 वा भारतीय खेळाडू ठरला आहे. मात्र, केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवू शकला नाही. कोलकाताने बुधवारी अय्यरची आयपीएल 2022 साठी संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्ती केली.

दरम्यान, एकदिवसीय मालिकेतील सर्व सामने प्रेक्षकाविना खेळले गेले, परंतु टी-20 मालिकेत 75% चाहत्यांना प्रवेश देण्यात आला आहे.

दोन्ही संघ:
भारत: इशान किशन, रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल.

WI: ब्रँडन किंग, काइल मेयर्स, निकोलस पूरन (wk), रोव्हमन पॉवेल, किरॉन पोलार्ड (कॅप्टन), रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, अकिल होसेन, ओडियन स्मिथ, फॅबियन ऍलन, शेल्डन कॉट्रेल.

2017 पासून हरलेली नाही टीम इंडिया
भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची शेवटची तीन द्विपक्षीय T20I मालिका जिंकली आहे. 2017 मध्ये वेस्ट इंडिजने शेवटच्या टी-20 मालिकेत भारताचा पराभव केला होता. टीम इंडियाला 5 वर्षांत वेस्ट इंडिजला हरवता आलेले नाही.

या खेळाडूंवर नजर
T20 मालिकेपूर्वी झालेल्या IPL लिलावात सध्याच्या टीम इंडियामध्ये समाविष्ट असलेल्या 10 खेळाडूंना लिलावात मोठे खरेदीदार मिळाले आहेत. अशा परिस्थितीत सर्वांच्या नजरा श्रेयस अय्यर (कोलकाता नाइट रायडर्स, रु. 12 कोटी 25 लाख), हर्षल पटेल (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, 10 कोटी 75 लाख) आणि शार्दुल ठाकूर (दिल्ली कॅपिटल्स, 10 कोटी 75 लाख) यांच्यावर असतील.

कोहलीचा फॉर्म चिंतेचा विषय
टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली वनडे मालिकेत काही खास कामगिरी करू शकला नाही. अशा स्थितीत आजच्या सामन्यात या खेळाडूकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. कोहलीचे शेवटचे शतक याच मैदानावर नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध झाले होते. कोहलीशिवाय श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांच्याकडूनही संघाला मोठ्या आशा आहेत. हे दोन्ही खेळाडू एकदिवसीय मालिकेत चांगल्या फॉर्ममध्ये होते.

बातम्या आणखी आहेत...