आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना टीम इंडिया कर्णधार आणि टीम इंडियातील खेळाडूसुद्धा क्वचितच विसरेल, कारण भारतीय संघाने ज्या दमदार पद्धतीने ही कसोटी मालिका आपल्याच भूमीवर सुरू केली, यापुढे होणाऱ्या कसोटीमध्येही ती दमदार कामगिरी करेल अशीच आशा सर्वांना होती.
मात्र इंदुरच्या लाजिरवाण्या पराभवानंतर चौथ्या कसोटीत टीम इंडियाची खरोखरच कसोटी लागणार आहे. कारण यावर WTC च्या अंतिम प्रवेशाची समीकरणेही बऱ्याच प्रमाणात अवलंबून आहेत. आता आपण जाणून घेऊ या टीम इंडियाच्या तिसऱ्या कसोटीतील पराभवाची कारणे
पराभवाची 5 प्रमुख कारणे-
1. इंदूरच्या होळकर स्टेडियमच्या खेळपट्टीबाबत भारतीय संघाच्या पहिल्या डावात टीका झाली होती, पहिल्या फलंदाजीसाठी खेळपट्टी लाल मातीने तयार केल्याची बातमी आली होती, त्यामुळे ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजासाठी फायदेशीर राहिल असे समजले जात होते. मात्र खेळपट्टीवर इतकं टर्न बघून पहिल्या दिवशी सर्वांनाच धक्का बसला आणि टीम इंडियाचा पहिला डाव अवघ्या 109 धावांवर आटोपला.
2. टीम इंडियाची सलामीची भागीदारीही अपयशी ठरली. कर्णधार रोहित शर्माने कसोटीत फेल होणाऱ्या केएल राहुलऐवजी शुभमन गिलचा संघात समावेश केला, पण गिलची बॅटही दोन्ही डावात काही विशेष करू शकली नाही.
3. टीम इंडियाची फलंदाजी दोन्ही डावात पूर्णपणे फ्लॉप ठरली, सलामीपासून मधल्या फळीपर्यंत एकाही फलंदाजाने योग्य फलंदाजी केली नाही, पुजाराने दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले असले तरी त्याचे अर्धशतक टीम इंडियाला तारू शकले नाही.
4. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा दोन्ही डावात फ्लॉप होणे हे टीम इंडियाचे मोठे नुकसानदायक म्हणून पाहिले जाऊ शकते, विराट कसोटी सामन्यांमध्ये किती झगडत आहे, याचा अंदाज यावरून लावता येईल की, गेल्या 15 डावात विराटने अर्धशतकही केले नाही. त्याच्याकडून टीम इंडियाला खूप अपेक्षा होत्या.
5. अष्टपैलू खेळाडू म्हणून अक्षर पटेल दोन डावात 12/15 धावांवर नाबाद राहिला, तर गोलंदाजीमध्ये त्याला पहिल्या डावात केवळ 13 षटके मिळाली आणि त्याने एकही विकेट मिळाली नाही, कर्णधार रोहित शर्माने अक्षर पटेलचा समावेश केला. परंतु इंदूरच्या होळकर स्टेडियमवर अक्षर पटेलच्या जागी कुलदीप यादवसारखा गोलंदाज संघासाठी मजबूत पर्याय ठरू शकला असता
ऑस्ट्रेलियाने विजयासाठी 76 धावांचे लक्ष्य 18.5 षटकात एक विकेट गमावून पूर्ण केले. संघाकडून दुसऱ्या डावात ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक नाबाद 49 धावा केल्या. मार्नस लबुशेनने नाबाद 28 धावांचे योगदान दिले.
ऑस्ट्रेलियाने भारताविरोधातील बॉर्डर-गावसकर मालिकेतील तिसरा कसोटी सामना 9 गड्यांनी आपल्या नावे केला आहे. या विजयामुळे कांगारूंच्या संघाने मालिकेत 2 विरुद्ध 1 असे पुनरागमन केले आहे. या मालिकेतील शेवटचा सामना 9 ते 13 मार्चदरम्यान अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळला जाईल.
तसेच वाचा क्रिकेटशी संबंधित या बातम्या...
स्पिन ट्रॅक बनवण्याचा निर्णय सगळ्यांचाच:पराभवानंतर रोहित म्हणाला-..
इंदूर कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध नऊ गडी राखून झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर खेळण्याचा संघाचा निर्णय असल्याचे म्हटले आहे. आमच्या फलंदाजांसाठीही ते आव्हानात्मक असेल हे आम्हाला माहीत होते, पण आम्ही त्यासाठी सज्ज होतो, परंतु भारतीय फलंदाज पहिल्या डावात चांगली फलंदाजी करू शकले नाहीत. सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.