आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Asia Cup 2022, India Mohammed Shami Badruddin Siddiqui Coach Reaction, India Lost Because Shami Was Not Given A Chance, Says Coach How Do You Leave Out Someone Who Made His Team Champions In IPL

शमीला संधी न दिल्यामुळे भारताचा पराभव:कोच म्हणाले- ज्याने IPL मध्ये आपल्या टीमला चॅम्पियन बनवले, त्याला तुम्ही बाहेर कसे ठेवता

राजकिशोरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आशिया चषक 2022 च्या अंतिम फेरीतही टीम इंडिया पोहोचू शकली नाही. भारताला पहिल्यांदा पाकिस्तानने आणि नंतर श्रीलंकेने पराभूत केले. संपूर्ण स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाचा सर्वात कमकुवत दुवा म्हणजे ठिसाळ गोलंदाजी. यावेळी वेगवान गोलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केलीये.

संघात फक्त 3 वेगवान गोलंदाज होते. विशेष म्हणजे जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त असतानाही मोहम्मद शमीला संघात स्थान मिळाले नाही. या निर्णयावर सर्वत्र टीकासुद्धा होत आहे.

मोहम्मद शमीचे प्रशिक्षक बद्रुद्दीन सिद्दीकी यांचेही मत आहे तेच आहे की आशिया चषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी त्यांनी त्यांच्या शिष्याकडे म्हणजे मोहम्मद शमीला टीम मध्ये स्थान द्यायला हवे होते. शमीकडे दुर्लक्ष करणे भारतीय संघाला चांगलेच महागात पडले आहे.

शमीचे प्रशिक्षक बद्रुद्दीन सिद्दीकी यांनी दिव्य मराठीशी संवाद साधत त्यांनी टीम निवडीबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, शमीने IPL मध्ये चमकदार कामगिरी करून आपल्या संघाला गुजरात चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे.

अशा परिस्थितीत बुमराहसारखा गोलंदाज दुखापतीमुळे टीममध्ये नसताना शमीसारख्या अनुभवी गोलंदाजाकडे दुर्लक्ष करणे त्यांच्या समजण्या पलीकडचे आहे. त्यांच्यांशी झालेल्या संवादाचे काही ठळक मुद्दे…

प्रश्न- आशिया चषक स्पर्धेत मोहम्मद शमीची उणीव तूम्हाला भासत नाही का?

उत्तर- नक्कीच मोहम्मद शमीची उणीव संपूर्ण आशिया कपमध्ये मला जाणवत आहे. बुमराह संघात नसताना त्याला तर टीम इंडियात आशिय कपसाठी घेण्याची खरं तर गरज होती. मी मानतो की त्याला व्यवस्थापनाने कसोटी सामन्यासाठी तयार ठेवले आहे, जेणेकरून तो तंदुरुस्त राहील.

परंतू सध्याची परिस्थिती अशी होती की आपला अनुभवी गोलंदाज बुमराह दुखापतीमुळे संघाबाहेर होता. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत अनुभवी गोलंदाजाला संधी द्यायला हवी होती. आता सध्या आशियकप मध्ये जे गोलंदाज गेले आहेत त्यांच्यामध्ये अनुभवाची कमतरता दिसून येते. पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध आम्ही हरण्याचे मुख्य कारण म्हणजे आमची ठिसाळ गोलंदाजी आहे.

प्रश्न- आपणास असे वाटते का की शमीसारखा अनुभवी गोलंदाज टीम मध्ये असता तर आज काही वेगळे चित्र असते?

उत्तर- मी असे सांगू शकत नाही, पण अनुभवी गोलंदाज संघात असायला हवा होता. मोहम्मद शमीकडून आम्ही अपेक्षा करू शकतो. संपूर्ण IPL मध्ये त्याने चांगली गोलंदाजी केली आहे. तो सतत नव्या चेंडूवर टीमला विकेट मिळवून देत होता. मग तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष कसे करू शकता?

शमीचे प्रशिक्षक बदरुद्दीन सिद्दीकी (डावीकडून) त्यानंतर मोहम्मद शमी आणि IPL चा वेगवान गोलंदाज मोहसीन खान.
शमीचे प्रशिक्षक बदरुद्दीन सिद्दीकी (डावीकडून) त्यानंतर मोहम्मद शमी आणि IPL चा वेगवान गोलंदाज मोहसीन खान.

प्रश्न- तुमच्या मते शमीचा संघात समावेश न करण्याचे काय कारण असू शकते ?

हे बघा, खरे कारण तर निवडकर्तेच कारण सांगू शकतात. संघ व्यवस्थापन नेमका काय विचार करत आहेत हे मी सांगू शकत नाही, परंतु मला असे वाटते की नवीन मुलांना संधी देणे ही चांगली गोष्ट आहे. त्याचे कौतुकही केले पाहिजे. पण आशिया कप ही एक मोठी स्पर्धा आहे. अशा स्थितीत आम्ही ते लक्षात घेऊन टीम खेळाडू निवडायला हवे होते.

भुवनेश्वर कुमारही यापूर्वी फारसा चांगला खेळत नव्हता. पण तोही गेल्या काही काळापासून चांगली कामगिरी करताना दिसतो आहे. अशा स्थितीत त्याला टीमसोबत आणखी एखाद्या अनुभवी गोलंदाजांची साथ देण्याची गरज होती. .

शमीच्या अनुपस्थितीमुळे संपूर्ण भार हार्दिक पंड्यावर पडला. त्याचा परिणाम त्याच्या कामगिरीतही कुठेतरी दिसून येत होताच. दुसरीकडे संघातील इतर गोलंदाजांची चांगली कामगिरी होत नव्हती. त्यामुळे आम्हाला कठिण परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे.

आज परिस्थिती अशी होती की अंतिम फेरी गाठण्यासाठी आम्हाला इतर संघांच्या विजय-पराजयावर अवलंबून राहावे लागले. तसे पाहिले तर आशियामध्ये भारतापेक्षा मजबूत असी कोणतीही टीम नाही आणि त्याच्या पुढे कोणत्याही टीमचा निभाव लागत नाही. असे असूनही, एका छोट्याशा चुकीमुळे आम्ही दोन्ही सामने गमावले आहेत.

कारण हा सामना 20-20 आहे आणि एक गोलंदाज फक्त 4 षटके टाकू शकतो. अशा परिस्थितीत तुमच्या संघात 5 चांगले गोलंदाज असणे आवश्यक आहे.

मोहम्मद शमी T20 विश्वचषक 2021, T-20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचा भाग होता.
मोहम्मद शमी T20 विश्वचषक 2021, T-20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचा भाग होता.

प्रश्न- मोहम्मद शमी सध्या कुठे सराव करत आहे आणि मॅचबाबतीत तुमच्या दोघांमध्ये काय चर्चा होत असते?

उत्तर- मोहम्मद शमी सध्या मुरादाबादमध्ये सराव करत आहे. आम्ही सामन्यांबद्दल काही बोलत नाही. कारण आता याबद्दल बोलून काही उपयोग नाही. आता आपण काहीच करू शकत नाही. अशा परिस्थितीत तो केवळ आपल्या सरावावर लक्ष केंद्रित करत आहे.

टीम इंडियाला त्याची गरज ऑस्ट्रेलियात पडणार आहे. तिथे टी-20 वर्ल्डकप होणार आहे. तिथे एक बाउन्सी विकेट आहेत. अशा परिस्थितीत तेथे वेगवान गोलंदाजाची आवश्यकता असते. अशा स्थितीत शमीला बुमराहसोबत तिथे असणे आवश्यक आहे.

प्रश्न- आशिया कपमध्ये निवडकर्त्यांनी शमीकडे दुर्लक्ष करून जी चूक केली ती टी-20 विश्वचषकात करणार नाही, असे तुम्हाला वाटते का?

उत्तर- आशिया चषकातील पराभव आणि सामन्यातील खराब कामगिरीमुळे मला असे वाटते की यावेळी निवडकर्ते शमीला संघात घेण्याचा विचार नक्की करतील. भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही शमीचा संघात समावेश न केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले होते.

शास्त्री हे टीम इंडियाचे प्रशिक्षक राहिले आहेत. शमीची गोलंदाजी ते चांगल्याप्रकारे जाणतात आणि टीम इंडियालाही चांगल्या प्रकारे ओळखतात. अशा परिस्थितीत जर शमीची निवड न झाल्याने ते प्रश्न उपस्थित करत असतील तर प्रत्येकाने यावर विचार करायला हवा.

बातम्या आणखी आहेत...