आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबांगलादेशने दुसऱ्या वनडेत भारताला ५ धावांनी हरवले. त्याचबरोबर संघाने ३ सामन्याच्या मालिकेत २-० ने कब्जा केला. भारताने बांगलादेश विरुद्ध सलग दुसऱ्यांदा मालिका गमावली. भारताने अखेरच्या वेळी २०१४ मध्ये मालिका जिंकली होती. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने ७ बाद २७१ धावा उभारल्या. एकवेळ ६९ धावांवर संघाचे ६ फलंदाज बाद झाले होते. महमुदुल्लाहने (७७) सातव्या गड्यासाठी मेहंदी हसन मिर्झा (१००*) सोबत १४८ धवांची भागीदारी रचली. त्यानंतर मेहंदीने आठव्या गड्यासाठी नासुम अहमद (१८*) सोबत २३ चेंडूंत ५४ धावांची नाबाद भागीदारी करत संघाला २७० धावांवर पोहोचवले. वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक ३, मो. सिराज व उमरान मलिकने प्रत्येकी २-२ गडी बाद केले. प्रत्युत्तरात भारतीय संघ निर्धारित षटकांत ९ बाद २६६ धावा करू शकला. रोहित शर्मा जखमी असल्याने कोहलीने सलामी दिली. मात्र तो अवघ्या ५ धावांवर परतला. शिखर धवनही (८) अपयशी ठरला. श्रेयस अय्यरने (८२) अर्धशतकी खेळी केली. श्रेयसने गेल्या ११ डावात ६ अर्धशतके व एक शतक झळकावले आहे. त्याचबरोबर तो चालू यंदाच्या वर्षांत सर्वाधिक धावा करणारा भारतीय बनला. त्याने १६ सामन्यात १४ डावता ९१.८४ च्या स्ट्राइक रेटने ७२१ धावा केल्या. श्रेयसने भारतासाठी ३४ डावांत सर्वात वेगवान १५०० वनडे धावादेखील केल्या आहेत. त्याने लोकेश राहुलला (३६) मागे टाकले. रोहितने (५१*) अर्धशतकी खेळी केली. त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ५०० षटकार पूर्ण झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.