आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • India Lost For The Seventh Time In A Row Against South Africa This Year, South Africa Won By 4 Wickets; 2 0 Lead In The Series

दक्षिण आफ्रिका 4 गड्यांनी विजयी:मालिकेत 2-0 ने आघाडी, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध यंदा भारताचा सलग सातव्या सामन्यामध्ये पराभव

कटक19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामनावीर हेनरीच क्लासेनच्या (८१) झंझावाती खेळीच्या बळावर पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाने रविवारी यजमान टीम इंडियाचा पराभव केला. आफ्रिका संघाने दुसरा टी-२० सामना ४ गड्यांनी जिंकला. यासह भारतीय संघाला घरच्या मैदानावर सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले.

बावुमाच्या नेतृत्वात आफ्रिका संघाने पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-० ने आघाडी घेतली. मालिकेतील तिसरा व भारतासाठीचा निर्णायक सामना उद्या मंगळवारी विशाखापट्टणम येथे रंगणार आहे. भारताने यंदा आफ्रिकेविरुद्ध सलग सातवा सामना गमावला. यात दाेन कसाेटीसह तीन वनडे व आता दाेन टी-२० चा समावेश आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ६ बाद १४६ धावा काढल्या. प्रत्युत्तरात आफ्रिका संघाने १८.२ षटकांत सहा गड्यांच्या माेबदल्यात विजयाचे लक्ष्य सहज गाठले. भुवनेश्वरची गोलंदाजी व्यर्थ ठरली. त्याने चार बळी घेतले.

डिकाॅकला विश्रांती; क्लासेनला संधी
सलामीच्या विजयाने फाॅर्मात असलेल्या पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यात एक बदल केला. टीमने यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डिकाॅकला विश्रांती दिली. त्याला गत सामन्यात गंभीर दुखापत झाली हाेती. त्याच्या जागी संघात हेनरीच क्लासेलनला सहभागी करण्यात आले. तसेच यष्टीरक्षक ट्रिस्टन स्टब्सला विश्रांती देण्यात आली. त्याच्या जागी सलामीवीर फलंदाज रिझा हेन्ड्रिक्सला संधी देण्यात आली. भारतीय संघात बदल करण्यात आला नाही.

धावफलक, नाणेफेक द. आफ्रिका (गोलंदाजी)
भारत धावा चेंडू ४ ६
ऋतुराज झे.महाराज गो. रबाडा ०१ ०४ ०० ०
किशन झे.डुस्सेन गो. नाेर्टेजे ३४ २१ ०२ ३
श्रेयस झे.क्लासेन गो. प्रिटाेरियस ४० ३५ ०२ २
ऋषभ झे.डुस्सेन गो. महाराज ०५ ०७ ०० ०
हार्दिक त्रि.गो. पार्नेल ०९ १२ ०१ ०
अक्षर पटेल त्रि.गो. नाेर्टेजे १० ११ ०१ ०
दिनेश कार्तिक नाबाद ३० २१ ०२ २
हर्षल पटेल नाबाद १२ ०९ ०२ ०
अवांतर : ०७, एकूण : २० षटकांत ६ बाद १४८ धावा.

दक्षिण आफ्रिका धावा चेंडू ४ ६ तेंबा बावुमा त्रि.गो. युजवेंद्र चहल ३५ ३० ०४ १ रिझा हंेड्रिक्स त्रि.गो. भुवनेश्वर ०४ ०३ ०१ ० प्रिटाेरियस झे.आवेश गो. भुवनेश्वर ०४ ०५ ०१ ० डुस्सेन त्रि. गो. भुवनेश्वर ०१ ०७ ०० ० क्लासेन झे.रवी गो. हर्षल ८१ ४६ ०७ ५ डेव्हिड मिलर नाबाद २० १५ ०१ १ वायने पार्नेल त्रि.गो. भुवनेश्वर ०१ ०४ ०० ० कागिसाे रबाडा नाबाद ०० ०० ०० ० अवांतर : ०३, एकूण : १८.२ षटकांत ६ बाद १४९ धावा.

बातम्या आणखी आहेत...