आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारोहित शर्मा आता वनडे आणि टी-20 नंतर कसोटी संघाचा कर्णधार असेल. बीसीसीआय तिन्ही फॉरमॅटमध्ये एकच कर्णधार धोरणाकडे वळले आहे. रोहितच्या नावावर पुढील आठवड्यात शिक्कामोर्तब होऊ शकतो. यादरम्यान श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीही संघ निवडला जाईल.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इनसाइड स्पोर्ट्स या वेबसाइटला सांगितले की, निवडकर्ते, खेळाडू, प्रशिक्षक या सर्वांना रोहित शर्माला कर्णधार बनवायचे आहे. पुढील आठवड्यात श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघ निवड झाल्यानंतर रोहितच्या कसोटी कर्णधारपदी नियुक्तीची अधिकृत घोषणा केली जाईल, असे ते म्हणाले.
नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेनंतर विराट कोहलीने कर्णधारपद सोडले होते. यानंतर आतापर्यंत कोणत्याही खेळाडूला टीम इंडियाचा कसोटी कर्णधार बनवण्यात आलेले नाही.
24 फेब्रुवारीपासून सुरू होणार मालिका
बीसीसीआयने मंगळवारी टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या टी-20 आणि कसोटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 24 फेब्रुवारीपासून श्रीलंका संघाचा दौरा सुरू होणार आहे. मोहाली येथे 4 मार्चपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. माजी कर्णधार विराट कोहली मोहालीत 100 वा कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यात रोहित त्यांचा कर्णधार असेल. या मालिकेतील पहिला T-20 सामना लखनौमध्ये खेळवला जाणार आहे. 24 फेब्रुवारीपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे.
रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा केला पराभव
टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका खेळत आहे. 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत मालिका 3-0 ने जिंकली. रोहितच्या नेतृत्वाखाली, भारताने 39 वर्षानंतर प्रथमच वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय सामन्यात क्लीन स्वीप केला.16 फेब्रुवारीपासून उभय संघांमधील टी-20 मालिका सुरू होणार आहे. या वर्षी टी-२० विश्वचषकही खेळवला जाणार आहे. अशा परिस्थितीत श्रीलंका आणि वेस्ट इंडिजविरुद्धची टी-20 मालिका खूप महत्त्वाची मानली जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.