आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत-न्यूझीलंड यांच्यात बुधवारी हैदराबादेत झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात शुभमन गिलने १४९ चेंडूूंत २०८ धावा केल्या. दुहेरी शतक करणारा तो जगातील सर्वात तरुण आणि भारताचा पाचवा खेळाडू ठरला. त्याने २३ वर्षे १३२ दिवसांच्या वयात ही कामगिरी केली. यापूर्वी हा विक्रम ईशान किशनच्या नावे (२४ वर्षे १५४ दिवस) होता. शुभमन सर्वात कमी डावांत १००० धावा करणारा भारतीय फलंदाज बनला. प्लेअर ऑफ द मॅच शुभमन १९व्या डावात इथपर्यंत पोहोचला. यापूर्वी विराट कोहली आणि शिखर धवनने २४व्या डावात १००० धावा केल्या होत्या. भारताने हा सामना १२ धावांनी जिंकला. ३५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणारा न्यूझीलंड ४९.२ षटकांत सर्वबाद झाला.
208 धावा १४९ चेंडूंत 23 वर्षे १३२ दिवस वयात केली कमाल
हाही विक्रम
१९ डावांत १००० धावा करणारा पहिला भारतीय
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.