आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनडे:भारत-न्यूझीलंड आज सलामी सामना, सामना ईडन पार्कवर सकाळी 7.00 वाजेपासून

ऑकलंड5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टी-२० मालिका विजयानंतर आता टीम इंडिया वनडे सिरीजही आपल्या नावे करण्यासाठी उत्सुक आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आता वनडे विश्वचषकाच्या मिशनला सुरुवात करत आहे. याच माेहिमेला विजयाने सुरुवात करण्याचा कर्णधार धवनचा मानस आहे. भारत आणि यजमान न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालकेला शुक्रवारपासून सुरुवात हाेत आहे. सलामीचा वनडे सामना ईडन पार्कवर सकाळी ७.०० वाजेपासून रंगणार आहे. धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आता न्यूझीलंडविरुद्ध वनडे फाॅरमॅटमधील पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी उत्सुक आहे. भारताला वनडेत सलग चार वेळा न्यूझीविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला.

ट्राॅफीपेक्षा संघ निवड महत्त्वाची
संघातील सीनियर खेळाडू या मालिकेदरम्यान नाहीत. त्यामुळेच ट्राॅफीपेक्षाही सर्वाेत्तम संघ निवडीवर अधिक भर देण्यासाठी कर्णधार आणि प्रशिक्षक उत्सुक आहेत. याच संतुलित संघाच्या बळावर मालिका विजयाचे लक्ष्य सहज गाठता येईल, असा विश्वास धवनने व्यक्त केला. याच मालिकेच्या माध्यमातून टीम इंडिया वनडे विश्वचषकाच्या तयारीला सुरुवात करत आहे. त्यामुळे मालिकेदरम्यानची सर्वाेत्तम खेळी नाेंद हाेणार आहे. यादरम्यान युवा खेळाडू स्वत:ची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी उत्सुक आहेत. भारताने २०१९ विश्वचषकानंतर आतापर्यंत ३९ वनडे सामने खेळले. ६ खेळाडूंनीच २० पेक्षा अधिक वनडे सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
छाेट्या बाउंड्रीमुळे झंझावाताची संधी : ऑकलंडमधील ईडन पार्क स्टेडियमची बाउंड्री छाेटी मानली जाते. यातून फलंदाजांना झंझावाती खेळी करण्याची संधी आहे. गत १२ डावांत सहा संघांनी माेठी खेळी केली. आता टीम इंडियाच्या सूर्यकुमारला ३६० डिग्रीने फटकेबाजी करण्याची संधी आहे.

धवन सर्वाधिक वेळा नेतृत्व करणारा एकमेव
शिखर धवन हा सध्या प्रभारी कर्णधाराच्या भुमिकेत आहे. मात्र, त्याच्या नावे २०२२ मध्ये सर्वाधिक वेळा टीम इंडियाचे नेतृत्व करण्याची विक्रमी कामगिरी नाेंद झाली आहे. त्याने यंदाच्या सत्रामध्ये भारतीय संघाकडून सहाव्यांदा वनडेत कर्णधाराची भूमिका बजावली आहे. आता त्याच्या नेतृत्वात टीम सातवी वनडे मालिका खेळणार आहे. यासह त्याने या विक्रमात राेहित आणि राहुलाही मागे टाकले. या दाेघांच्या नावे प्रत्येकी ६ वनडेची नाेंद आहे.

बातम्या आणखी आहेत...