आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूझीलंड WTC चॅम्पियन:न्यूझीलंडने भारताला 8 गड्यांनी हरवले; सात बळी घेणारा काइल जेमिसन ठरला सामनावीर

साऊथॅम्प्टनएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • रिझर्व्ह डेमध्ये भारतीय संघ दुसर्‍या डावात 2 विकेटवर 64 धावांच्या पुढे खेळणे सुरू करेल.

न्यूझीलंड टीम ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन बनली आहे. साऊथॅम्प्टनमध्ये झालेल्या फायनलमध्ये टीम इंडियाला न्यूझीलंडने 8 विकेटने पराभूत केले. 91 वर्षांच्या इतिहासात न्यूझीलंड संघाने पहिल्यांदा ICC वर्ल्डकप जिंकला आहे. कीवी संघाने 10 जानेवारी 1930 मध्ये आपला पहिला सामना इंग्लंडविरुद्ध खेळाला होता. तेव्हापासून कोणताही वर्ल्डकप जिंकला नव्हता. तेव्हाच ICC ने पहिल्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप म्हणजे टेस्ट वर्ल्डकपचे टूर्नामेंट सुरु केले. स्कोअरकार्ड पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

भारतीय संघाने दिले होते 139 धावांचे टार्गेट
पावसामुळे जवळपास अडीच दिवसांचा खेळ न झाल्यामुळे नंतर रिझर्व्ह डे मध्ये सामन्याचा निर्णय लागला. सामन्यात टॉस पराभूत झाल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करत 217 धावा काढल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने 249 धावा काढल्या.त्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या डावात 170 धाव काढत 139 धावांचे टार्गेट दिले. न्यूझीलंडने 2 विकेट गमावून 140 धाव काढून सामना खिशात घातला.

दुसर्‍या डावामध्ये न्यूझीलंडसाठी कप्तान केन विलियम्सन ने 52 आणि रॉस टेलरने 47 धावांची नाबाद खेळी केली. विल्यम्सनची टेस्ट करियरची ही 33वी फिफ्टी आहे. ओपनर डेव्हॉन कॉनवे 19 आणि टॉम लाथेने 9 धाव काढल्या, स्पिनर रविचंद्रन अश्विनने 2 विकेट घेतल्या.

न्यूझीलंडचा दुसरा डाव
स्पिनर रविचंद्रन अश्विनने न्यूझीलंडला सुरुवातीला दोन झटके दिले. अश्विनने टॉम लॅथमला ऋषभ पंतद्वारे स्टम्प आऊट केले. लॅथम 41 बॉलवर 9 धाव काढून बाद झाला. त्यानंतर डेवॉन कॉनवेला 19 धावांवर LBW केले. यासोबतच अश्विन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वात जास्त 71 विकेट घेणारा गोलंदाज बनला. अश्विनने ऑस्ट्रेलियाचा खेळाडू पॅट कमिन्सला मागे टाकले आहे.

भारतीय फलंदाजात विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंतने 41 आणि रोहित शर्माने 30 धावा केल्या. रवींद्र जडेजा 16 , अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी 15-15 धावा काढल्या. किवी टीमकडून फास्ट बॉलर टीम साऊदीने 4 विकेट घेतल्या. ट्रेंट बोल्टने 3 आणि जेमिसनने 2 विकेट घेतल्या. नील वॅग्नरला 1 विकेट मिळाली.

भारताचा डाव ऋषभ पंतने सांभाळला

 • रिझर्व्ह डेमध्ये भारताने दुसऱ्या डावात 2 विकेटवर 64 धावा काढल्या. कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा नाबाद होते.
 • दोन्ही दिग्गज 7 धावाच जोडू शकले होते आणि संघाला तिसरा झटका लागला. जेमिसनने सामन्यात दुसऱ्या डावात दुसऱ्यांदा बाद केले.
 • कोहली 13 धावा काढून विकेटकिपर बीजे वॉटलिंगद्वारे झेलबाद झाला. जेमिसननेच 72 स्कोअरवर भारताला चौथा झटका दिला.
 • त्याने पुजाराला 15 धावांवर बाद केले. 109 स्कोअरवर भारताचा अर्धा संघ तंबूत परतला होता.
 • रहाणेने ऋषभ पंतसोबत चौथ्या विकेटसाठी 37 धावा केल्या. परंतु पंतने एका बाजूने सांभाळत खेळी करून संघाला 100 धावांची लीड मिळवून दिली.
 • 142 च्या स्कोअरवर भारताची सहावी विकेट पडली. यावेळी नील वॅग्नरने रवींद्र जडेजाला 16 धावांवर विकेटकिपरद्वारे झेलबाद केले.
 • दुसऱ्या बाजूला डाव सांभाळत खेळत असलेल्या पंतने जडेजासोबत 33 धावा केल्या. येथून पुढे पंतही जास्त वेळ मैदानावर टिकू शकला नाही आणि तंबूत परतला.
 • 156 धावांवर भारताला 7वा झटका लागला. ऋषभ पंत 41 धावांवर निकोल्सद्वारे झेलबाद झाला. ट्रेंट बोल्टने पंतला बाद केले.
 • बोल्टने याच ओव्हरमध्ये रविचंद्रन अश्विनला तंबूत पाठवून भारताला 8वा झटका दिला. यावेळी भारताकडे 124 धावांची लीड होती.
बातम्या आणखी आहेत...