आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट:भारत-पाकिस्तानमध्ये 9 वर्षांनंतर टी-20 सिरीज होण्याची शक्यता

लाहोर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत व पाकिस्तान यांच्यात ९ वर्षांनी द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळवली जाऊ शकते. पाक माध्यमांनुसार, या वर्षी दोन्ही संघांदरम्यान ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाऊ शकते. २०१२-१३ मध्ये पाकिस्तानने भारत दौऱ्यात २ टी-२० व ३ एकदिवसीय सामने खेळले होते. त्यानंतर राजकीय वादामुळे दोन्ही देशांत द्विपक्षीय मालिका खेळवण्यात आली नाही. केवळ आयसीसी व एसीसीच्या स्पर्धेदरम्यान दोन्ही संघ समोरासमोर आले.

भविष्यातील नियोजनात मालिकेसाठी निश्चित स्थान नाही. मात्र, पाकिस्तान क्रिकेट मंडळाने म्हटले की, ते भविष्यात होणाऱ्या चर्चेसाठी तयार आहेत. या वर्षी दोन्ही संघांत मालिका होण्याचे संकेत दिले आहेत. पीसीबीच्या सूत्रांनी म्हटले की, मालिका होणार असेल, तर भारतीय संघ पाक दौऱ्यावर येईल. गतवेळी पाकने भारत दौरा केला होता.

बातम्या आणखी आहेत...