आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेलंबाे:टीम इंडिया सलग दुसऱ्या मालिका विजयासाठी सज्ज, आज भारत-श्रीलंका दुसरा टी-20 सामना

काेलंबाे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धवनच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघ आता यजमान श्रीलंकेविरुद्ध वनडेपाठाेपाठ टी-२० मालिका विजयासाठी सज्ज झाला आहे. याच इराद्याने टीम इंडिया मंगळवारी मैदानावर उतरणार आहे. भारत व यजमान श्रीलंका दुसरा टी-२० सामना रंगणार आहे. भारताने तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. श्रीलंका टीमसाठी हा निर्णायक सामना आहे.

पृथ्वी, सूर्यकुमारचा सहभाग अनिश्चित : टीम इंडियाचा युवा सलामीवीर पृथ्वी शाॅ आणि सूर्यकुमार यादवची इंग्लंड दाैऱ्यासाठी निवड झाली आहे. त्यामुळे या दाेघांचा दुसऱ्या टी-२० सामन्यातील सहभाग अनिश्चित मानला जात आहे. सूर्यकुमारला आता पहिल्यांदा भारतीय कसाेटी संंघात स्थान मिळाले. त्यामुळे दर्जेदार खेळी करण्याचा त्याचा मानस आहे. येत्या ४ आॅगस्टपासून भारत आणि यजमान इंग्लंड यांच्यातील पाच कसाेटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात हाेईल.

बातम्या आणखी आहेत...