आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताचा श्रीलंका दौरा:श्रीलंका संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकांना काेराेना; भारताविरुद्ध वनडे मालिका आता 17 जुलैपासून

कोलंबोएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीलंका क्रिकेट संघाचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रँट फ्लाॅवर आणि कर्मचारी निराेशन शुक्रवारी काेराेना पाॅझिटिव्ह असल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला. त्यामुळे आता भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेच्या वेळापत्रकात तातडीने बदल करण्यात आला. आता या मालिकेला १३ एेवजी १७ जुलैपासून सुरुवात हाेईल. मालिकेतील तीन वनडे १७, १९ व २१ जुुलैदरम्यान हाेतील. त्यानंतर २४, २५ व २७ जुलैदरम्यान तीन टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. मालिकेतील सर्व सामने कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवले जातील.

भारत व श्रीलंकाने १९८४ पासून प्रत्येक वर्षी कमीत कमी एक आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. दोन्ही संघात आतापर्यंत १५९ वनडे झाले. श्रीलंकेने भारताविरुद्ध अखेरची वनडे मालिका १९९७ मध्ये जिंकली होती. २०१७ नंतर श्रीलंकेच्या कामगिरीत घसरण झाली.

दाैऱ्यात भारताकडून धवन सरस खेळी करणारा एकमेव
शिखर धवनच्या नव्या नेतृत्वात पहिल्यांदाच येत्या १७ जुलैपासून श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका खेळण्यासाठी भारताचे युवा खेळाडू काेलंबाेच्या मैदानावर उतरणार आहे. नेतृत्वातून धवनला आता श्रीलंकेविरुद्ध आपले वर्चस्व कायम ठेवण्याची संधी आहे. त्याच्या या टीमविरुद्ध सरस खेळी नाेंद आहे. त्यामुळे त्याच्याकडूनही टीमला आता या मालिकेत लक्षवेधी कामगिरीची आशा आहे. तसेच मनीषही यासाठी सज्ज झाला आहे.

यजमान श्रीलंकन खेळाडूंचा क्वॉरंटाइन कालावधी वाढणार
श्रीलंका क्रिकेट संघ नुकताच इंग्लंड दौऱ्यावरून मायदेशी दाखल झाला आहे. काेराेनामुळे आता यजमान श्रीलंका संघातील खेळाडूंचा क्वॉरंटाइन कालावधी वाढवण्यात आला. त्यामुळे खेळाडू सराव करू शकणार नाहीत. इंग्लंड संघाचे ७ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने श्रीलंकेनेदेखील आपल्या संघाची कोरोना चाचणी केली. मात्र, केवळ फलंदाजी प्रशिक्षक ग्रँट फ्लॉवर पॉझिटिव्ह आले. मालिकेसाठी दासून शानाकाकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...