आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • India Team T20 Test Squad VS New Zealand Update; Rohit Sharma Ajinkya Rahane | KL Rahul Rishabh Pant

पहिल्या कसोटीसाठी 16-सदस्यीय टीम घोषित:अजिंक्य रहाणे कर्णधार, कोहली-रोहितसह बुमराह आणि ऋषभला विश्रांती; हनुमा विहारी संघाबाहेर

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

17 नोव्हेंबरपासून भारतीय संघ न्यूझीलंडशी घरच्या मैदानावर खेळणार आहे. यादरम्यान दोन्ही संघ तीन टी-20 आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहेत. पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली संघाचा भाग नाहीत. अजिंक्य रहाणे संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याचबरोबर चेतेश्वर पुजाराला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. विराट कोहली दुसऱ्या कसोटी सामन्यात संघात सामील होईल आणि कर्णधारपदाची धुरा सांभाळेल.

संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, केएल राहुल, मयंक अग्रवाल, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा, केएस भरत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्ण.

हनुमा विहारी संघाबाहेर
हनुमा विहारीला कसोटी संघातून वगळण्यात आले आहे. जानेवारी 2021 ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याने भारतासाठी शेवटची कसोटी खेळली होती. त्यानंतर सिडनीमध्ये हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीनंतरही त्याने फलंदाजी सुरूच ठेवली. हनुमाने 161 चेंडूंचा सामना करत 23 धावा केल्या. अश्विनच्या साथीने त्याने टीम इंडियाचा सामना वाचवला. विहारीने आतापर्यंत 12 कसोटी सामने खेळले असून 32.84 च्या सरासरीने 624 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एक शतक आणि चार अर्धशतके आहेत.

इंग्लंड दौऱ्यावर एकाही सामन्यात विहारीला संधी देण्यात आली नाही. त्याचबरोबर श्रेयस अय्यरही पहिल्या कसोटीत संघाचा भाग आहे. जयंत यादवचीही संघात निवड झाली आहे. या मालिकेतून राहुल द्रविड टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारणार आहे.

बातम्या आणखी आहेत...