आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट:ऑस्ट्रेलियाला टीम इंडियाचा आधार; कसाेटी मालिकेसाठी करणार दाैरा

सिडनीएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • वर्ल्डकप अनिश्चित; डिसेंबर-जानेवारीत चार टेस्ट सामन्यांची मालिका

लाॅकडाऊनमुुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए) सध्या चांगलेच आर्थिक अडचणीत सापडले आहे. याशिवाय आता याच काेराेनाच्या महामारीमुळे ऑस्ट्रेलियातील टी-२० विश्वचषकाच्या आयाेजनावर अद्यापही टांगती तलवार आहे. यातून यजमान ऑस्ट्रेलियाला या स्पर्धेच्या स्थगितीने माेठ्या आर्थिक नुकसानीला सामाेरे जावे लागणार आहे.  त्यामुळे डबघाईस आलेल्या ऑस्ट्रेलियाची आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी टीम इंडियाने पुढाकार घेतला. यासाठी  भारताने  ऑस्ट्रेलियाचा दाैरा करण्यास राजी असल्याचे स्पष्ट केले. यासाठी भारतीय संघाने आपण दाेन आठवड्यांपर्यंत ऑस्ट्रेलियात क्वाॅरंटाइनचीही तयारी दर्शवली. भारताचा संघ  डिसेंबर महिन्यात दाैऱ्यावर रवाना हाेणार आहे.

प्रेक्षकांच्या पाठबळाची उणीव भासेल : काेहली 

काेराेना या महामारीच्या संकटाने निर्माण झालेली गंभीर परिस्थिती लवकरच पूर्वपदावर येऊ शकते. हेच संकट निवळल्यानंतर पुन्हा नव्या जाेमाने क्रिकेटला सुरुवात हाेईल. मात्र, यादरम्यान चाहत्यांच्या अनुपस्थितीमध्ये स्टेडियमवर हे सामने आयाेजित केले जाऊ शकतील. त्यामुळे चाहत्यांच्या पाठबळाची उणीव भासेल, अशा शब्दात टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहलीने आपले मत मांडले. मात्र, यामुळे खेळाडूंच्या दर्जेदार कामगिरीवर याचा काेणत्याही प्रकारचा विपरीत परिणाम पडणार नाही, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...