आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-श्रीलंका क्रिकेट:मालिकेत 3 एकदिवसीय सामने आणि 3 टी-20 सामन्यांचा समावेश, 18 ते 29 जुलैदरम्यान मालिकेचे आयोजन; श्रीलंकेच्या संघात काही लोक आढळले होते पॉझिटिव्ह

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पहिले वेळापत्रक असे होते?

भारत आणि श्रीलंका संघादरम्यान होणाऱ्या एकदिवसीय आणि टी-20 सामान्यांची तारीख निश्चित करण्यात आली आहे. ही मालिका 18 ते 29 जुलैदरम्यान खेळली जाणार आहे. श्रीलंकेच्या संघात काही दिवसांपूर्वी फलंदाजी प्रशिक्षक आणि डेटा विश्लेषक कोरोनाबाधीत झाले होते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी ही मालिका 13 ते 25 जुलै दरम्यान आयोजित केली जाणार होती.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अद्याप सामन्यांच्या तारखांची घोषणा केलेली नाही. परंतु, माध्यमांच्या माहितीनुसार, पहिला एकदिवसीय सामना 18 जुलै, दुसरा सामना 20 जुलै आणि शेवटचा सामना 23 जुलैला खेळला जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. बीसीसीआय लवकरच याबाबत नवीन वेळापत्रक जाहीर करु शकते.

पहिले वेळापत्रक असे होते?
पहिल्या वेळापत्रकानुसार, मालिकेचा पहिला एकदिवसीय सामना 13 जुलै, दुसरा सामना 16 जुलै आणि तिसरा सामना 18 जुलै रोजी होणार होता. त्यानंतर टी -20 मालिका खेळली जाणार होती. परंतु, काही दिवसांपूर्वी श्रीलंकेच्या संघात काही लोक पॉझिटिव्ह आढळल्याने हा निर्णय काही दिवसांसाठी स्थगित करण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...