आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • India Vs Australia 1st T20 Update; Hardik Pandya On Indian Bowlers Performance, Hardik Pandya Seen Defending The Bowlers: Said Trust Them, They Are The Best Players In The Country

गोलंदाजांचा बचाव करताना दिसला हार्दिक पंड्या:म्हणाला - त्यांच्यावर विश्वास ठेवा, ते देशातील सर्वोत्तम खेळाडू आहेत

6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीम इंडियाचा पुढील सामना 23 सप्टेंबरला नागपूर येथे होणार. - Divya Marathi
टीम इंडियाचा पुढील सामना 23 सप्टेंबरला नागपूर येथे होणार.

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने पुढे येत गोलंदाजांचा बचाव केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3-टी-20 सिरीजमधील पहिला सामना गमावल्यानंतर हार्दिक म्हणाला- 'आम्हाला आमच्या गोलंदाजांवर विश्वास ठेवायला हवा.

एक-दोन सामने गमावले किंवा ओव्हर्स खराब टाकल्यामुळे काही फरक पडत नाही. ते देशातील सर्वोत्कृष्ट 15 क्रिकेटपटू आहेत, म्हणूनच ते टीम इंडियात आहे. एक किंवा दोन गेममुळे आमच्या योजनांमध्ये फारसा काही फरक पडणार नाही.

सामन्यानंतर मीडियाशी बोलताना पंड्याने जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाबद्दलही सांगितले- 'बुमराह टीममध्ये काय बदल करतो आणि तो आमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे.

साहजिकच त्याच्या उपस्थितीने टीमला खूप फरक पडेल, सध्या तो दुखापतीतून बरा होत आहे, त्यामुळे त्याला पुनरागमन करण्यासाठी पुरेसा वेळ देणे आवश्यक आणि स्वतःवर जास्त दबाव न टाकणे महत्त्वाचे आहे.

हार्दिक म्हणाला- 'आम्हाला एक चांगली टीम म्हणून पुढे यायचे आहे. पराभव तुम्हाला खूप काही शिकवते आणि आपण कुठे चांगले होऊ शकतो ते पण.आम्ही टीमच्या प्रकियेत आहोत आणि वर्ल्ड कप येईपर्यंत आम्ही योग्य टीम बनवण्यासाठी टीममध्ये योग्य त्या सुधारणा नक्की करू. मला आपल्या खेळाडूंवर खूप विश्वास आहे. येथे आणि तेथे काही खेळांमध्ये फारसा बदल होत नाही.

आम्हाला माहीत असते तर आम्ही त्यांना तिथेच थांबवले नसते का?

'सामना आमच्या हातून कुठे गेला? या प्रश्नावर हार्दिक हसून म्हणाला, हा सामना आमच्या हातून कुठे सुटला हेच मला कळले नाही. तूम्हाला कळले असेल तर तूम्हीच मला सांगा. पेन पॉईंटवर ते म्हणाले की आम्हाला माहीत असते तर आम्ही त्यांना तिथे थांबवले नसते का!

हर्षल पटेलच्या 18व्या षटकावर पंड्या म्हणाला- 'एका ओव्हरने फारसा काही फरक पडत नाही. त्यांच्या एका षटकामध्येही 24 धावा आल्या आहेत. द्विपक्षीय सिरीज सुरू असून अजून दोन सामने बाकी आहेत. त्यांच्यात आम्ही काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न नक्की करू.

30 चेंडूत नाबाद 71 धावांची तडाखेबंद खेळी

या सामन्यात पंड्याने टीम इंडियाचा स्कोअर 200 पर्यंत पोहोचवण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याने 30 चेंडूत 236.66 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 71 धावा केल्या. पंड्याने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 5 षटकार मारले.

ऑस्ट्रेलियाने हा सामना 4 विकेटने जिंकला

तीन सामन्यांच्या T20I सिरिजमधईल पहिला सामना ऑस्ट्रेलियाने भारताचा चार गडी राखून जिंकला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 विकेट्सवर 208 धावा करत या फॉरमॅटमधील सर्वोच्च धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात कांगारू संघाने 19.2 षटकांत 6 गडी गमावून लक्ष्य गाठले. कॅमेरून ग्रीनने सर्वाधिक 61 धावा केल्या.

या विजयासह ऑस्ट्रेलियाने सिरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पुढील सामना 23 सप्टेंबर रोजी नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...