आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

IND vs AUS टी-20:भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सनी केला पराभव; टीम इंडियाने 12 वर्षांपासून ऑस्ट्रेलियात एकही टी-20 मालिका गमावली नाही

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय अष्टपैलू हार्दिक पांड्याने 22 चेंडूंत 42 धावांची नाबाद खेळी खेळली. शेवटच्या षटकात त्याने 2 षटकार मारत सामना जिंकला. - Divya Marathi
भारतीय अष्टपैलू हार्दिक पांड्याने 22 चेंडूंत 42 धावांची नाबाद खेळी खेळली. शेवटच्या षटकात त्याने 2 षटकार मारत सामना जिंकला.
  • ऑस्ट्रेलियाने भारताला दिले होते 196 धावांचे आव्हान
  • अखेरच्या 10 षटकांत भारताने 109 धावा काढल्या

भारतीय संघाने 3 टी-20 मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 6 विकेट्सनी धूळ चारली. यासोबत भारताने 2-0 मालिका खिशात घातली. विजयासाठी भारतीय संघाने अखेरच्या 10 षटकात 109 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियामध्ये 12 वर्षांपासून टीम इंडियाने द्विपक्षीय टी -20 मालिका गमावली नाही. फेब्रुवारी 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून त्यांच्याच जमिनीवर टी-20 मालिकेत पराभव स्वीकारावा लागला होता.

दोन्ही संघांमध्ये 9 वी टी -20 मालिका खेळली जात आहे

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ही 9 वी टी-20 मालिका खेळली जात आहेत. मागील 8 मालिकांमध्ये भारताने 3 आणि ऑस्ट्रेलियाने 2 मालिका जिंकल्या आहेत. तर 3 ड्रॉ राहिल्या. ऑस्ट्रेलियात दोन्ही संघांमध्ये मागील 4 मालिकांत 11 बरोबरी राहिली आहे तर 2 मालिका ड्रॉ राहिल्या.

सिडनी येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक हारून प्रथम फलंदाजी करत 195 धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात भारताने 19.4 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात 195 धावा करत सामना खिशात घातला.

धवननंतर कोहलीने डाव सांभाळला

भारतीय सलामीवीर शिखर धवनने 52 धावा करत टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 11 वे अर्धशतक केले. याआधी त्याने लोकेश राहुलसोबत(30) 56 धावांची सलामीची भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. धवनने कर्णधार विराट कोहली (40)सोबत मिळून 39 धावांची भागीदारी केली. धवन-राहुल बाद झाल्यानंतर कोहलीने मोर्चा सांभाळला आणि हार्दिक पंड्यासोबत चौथ्या विकेटसाठी 29 धावांची भागीदारी केली.

टी -20 आंतरराष्ट्रीय मध्ये धवनची 11 वी फिफ्टी

सलामीवीर शिखर धववने (52) टी-20 मध्ये 11 वे अर्धशतक करून बाद झाला. अॅडम झम्पाच्या चेंडूवर स्वेप्सनने त्याचा झेल पकडला. सलामीवीर लोकेश राहुल 30 धावा करून अँड्र्यू टायच्या चेंडूवर बाद झाला. धवन आणि राहुलने पहिल्या विकटेसाठी 56 धावांची भागीदारी केली

.

ऑस्ट्रेलियाने 5 गडी बाद 194 धावा केल्या. अॅरॉन फिंचच्या अनुपस्थितीत कर्णधाराची धुरा सांभाळणाऱ्या मॅथ्यू वेडने अर्धशतक झळकावले. वेडने 32 चेंडूत 58 आणि स्मिथने 38 चेंडूत 46 धावांची खेळी केली. भारताचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकुर, दीपक चाहर आणि फिरकीपटू युजवेंद्र चहलने 12+ च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या.

सलामीवीर वेडने शानदार सुरुवात दिली

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मॅथ्यू वेडने संघाला शानदार सुरुवात दिली. त्याने डी'आर्की शॉर्ट (9) सोबत 47 धावांची सलामीची भागीदारी केली. दोघे बाद झाल्यानंतर स्मिथने एकहाती डाव सांभाळला आणि तिसऱ्या विकेटसाठी ग्लेन मॅक्सवेल सोबत 45 धावांची भागीदारी केली. यानंतर चौथ्या विकेटसाठी मोइसेस हेनरिक्स सोबत 47 धावांची भागीदारी करत संघाची धावसंख्या पुढे नेली.

कोहली-पंड्याने वेडचे सोपे झेल सोडले

सहाव्यात षटकातील दुसऱ्या चेंडूवर हार्दिक पंड्याने मॅथ्यू वेडचा सीमारेषेवर सोपा झेल सोडला. त्यावेळी वेड 43 धावांवर खेळत होता. यानंतर 8 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर कर्णधार कोहलीने वेडचा सोपा झेल सोडला. मात्र यावेळी वेड एक धावा घेण्याच्या प्रयत्नात बाद झाला.

दोन्ही संघ

भारत: लोकेश राहुल (यष्टीरक्षक), शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, संजू सैमसन, हार्दिक पंड्या, वाशिंगटन सुंदर, दीपक चाहर, युजवेंद्र चहल, शार्दूल ठाकुर आणि टी नटराजन।

ऑस्ट्रेलिया: डी'आर्की शॉर्ट, मैथ्यू वेड (कर्णधार आणि यष्टीरक्षक), स्टीव स्मिथ, ग्लेन मैक्सवेल, मोइसेस हेनरिक्स, मार्कस स्टोइनिस, सीन एबॉट, मिचेल स्वेप्सन, अँड्र्यू टाई, डेनियल सैम्स आणि अॅडम झम्पा

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser