आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • India Vs Australia 3rd T20 LIVE Score And Updates, Virat Kohali, Mathew Wed, India, Austraila, Cricket Score, Cricket Match Live Score, Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑस्ट्रेलियाचा भारतावर 12 धावांनी विजय:मॅक्सवेलला 3 जीवनदान देणे पडले भारी; भारताने सलग 5 वी टी-20 मालिका जिंकली

सिडनीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारताने ऑस्ट्रेलियाला पहिल्या टी-20मध्ये 11 धावा आणि दुसऱ्या सामन्यात 6 विकेट्सनी मात दिली होती

ऑस्ट्रेलियाने टी-20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताचा 12 धावांनी पराभव केला. भारताने सामना गमावला असला तरी मालिका मात्र 2-1 ने खिशात घातली आहे. यासोबत भारताने सलग 5 वी टी-20 मालिका जिंकली आहे.

सिडनीतील मैदानावर खेळलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक हारत प्रथम फलंदाजी करताना 187 धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघ 7 गडी बाद 174 धावांपर्यंत मजल मारू शकला. या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलला 3 जीवनदान मिळाले. याचा त्याने फायदा घेत झंझावती 54 धावांची खेळी केली.

कोहलीची टी-20 करिअरमधील 25 वी फिफ्टी

भारताचा कर्णधार विराट कोहलीने 61 चेंडूत सर्वाधिक 85 धावा केल्या. ही त्याच्या टी-20 कारकिर्दीतली 25वी फिफ्टी होती. तर ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू मिचेल स्वेप्सनने सर्वाधिक 3 गडी बाद केले.

भारताने 2008 पासून ऑस्ट्रेलियात टी-20 मालिका गमावली नाही

ऑस्ट्रेलियात भारतीय संघाटा टी-20 रेकॉर्ड चांगला आहे. भारताने मागील 12 वर्षांत ऑस्ट्रेलियात एकही टी-20 मालिका गमावलेली नाही. याआधी भारताला फेब्रुवारी 2008 मध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 मालिकेत पराभव स्वीकारावा लागला होता.

मॅक्सवेल आणि मॅथ्यू वेडची फटकेबाजी

ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 5 गडी बाद 186 धावसंख्या उभी केली. मॅथ्यू वेडने 53 चेंडूत 80 आणि ग्लेन मॅक्सवेलने 36 चेंडूत 54 धावांची खेळी केली. या सामन्यात वेडची तिसरे आणि मॅक्सवेलची 8 वे अर्धशतक होते. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी केली. सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली आणि वेड यांच्यात DRS वरून वादही पाहायला मिळाला. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने 2 गडी बाद केले. तर टी नटराजन आणि शार्दूल ठाकुरला 1-1 विकेट मिळाली.

वॉशिंग्टनने फिंच-स्मिथला बाद केले

वॉशिंग्टन सुंदरने डावाच्या सुरुवातीलाच अॅरॉन फिंचला बाद करत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. नंतर त्याने स्टिव्ह स्मिथला बाद केले. स्मिथने वेडसोबत दुसऱ्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी केली.

भारताकडे ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या मालिकेत व्हाइट वॉश देण्याची संधी

भारताने हा सामना जिंकला तर भारत ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरी दुसऱ्यांदा व्हाइट वॉश राहील. याआधी भारताने ऑस्ट्रेलियाला जानेवारी 2016 मध्ये 3-0 व्हाइट वॉश दिला होता.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser