आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • India Vs Australia 3rd T20, Suryakumar Plays 69 Innings With Fever : Doctors Told Give Pill...or Injection, But Heal By Evening

ताप असताना सूर्यकुमारची जिगरबाज 69 धावांची खेळी:डॉक्टरांना सांगितले - गोळी किंवा इंजेक्शन द्या, पण मॅचसाठी बरे करा

8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

'विजय मिळवण्यासाठी इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे.' टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने रविवारी हे सिद्ध केले आहे. ताप असतानाही तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या निर्णायक टी-20 सामन्यात उतरला आणि आपल्या दमदार खेळीने तो ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पण ठरला.

32 वर्षीय सूर्यकुमार यादवने 36 चेंडूत 191.66 च्या स्ट्राइक रेटने 69 धावांची धडाकेबाज खेळी खेळली. त्याच्या खेळीमुळे टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे लक्ष्य चार विकेट गमावून पूर्ण केले. विजयानंतर सूर्यकुमारने अक्षर पटेल यांच्याशी चर्चा करताना आपल्या आजाराविषयी सांगितले.

BCCI ने या संभाषणाचा व्हिडिओ सोमवारी सोशल मीडियावर पोस्ट केला. यामध्ये सूर्य कुमारने सांगितले की, या सामन्यापूर्वी त्याची तब्येत खराब होती आणि त्याची झोपही नीट झाली नव्हती.

अक्षरने विचारले कि तूला काय झाले होते? यावर सूर्यकुमार यादव म्हणाला- 'थोडे पोट दुखत होते, त्यानंतर तापही आला होता, पण मला हे देखील माहित होते की आजचा सामना हा निर्णायक आहे.

म्हणून मी माझ्या डॉक्टर आणि फिजिओला सांगितले की अशा आजारामुळे मी खेळणे थांबवू इच्छित नाही. तुम्ही काहीही करा... कसेही करा, कोणतीही गोळी द्या, कोणतेही इंजेक्शन द्या, पण मला संध्याकाळच्या खेळासाठी तयार करा. एकदा का तुम्ही मैदानावर आलात, जर्सी घातलात, की मग तुमच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण होते.

टीम इंडियाने 6 विकेट्सने कांगारूचा केला पराभव

टीम इंडियाने निर्णायक सामना 6 गडी राखून जिंकला. या विजयाच्या जोरावर त्याने टी-20 सामन्यांची सिरिज 2-1 ने जिंकली. पहिल्यांदा खेळताना ऑस्ट्रेलियाने 186 धावा केल्या.

टीम डेव्हिडने 54 आणि कॅमरून ग्रीनने 52 धावा केल्या. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक तीन बळी घेतले. प्रत्युत्तरात भारताने 19.5 षटकांत 4 गडी गमावून लक्ष्य गाठले.

सूर्यकुमार यादव-विराट कोहली या दोघांमध्ये 62 चेंडूत 104 धावांची भागीदारी झाली. शेवटच्या षटकात 11 धावांची गरज होती. कोहलीने पहिल्या चेंडूवर षटकार मारला आणि पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. यानंतर दिनेश कार्तिक आणि हार्दिक पंड्याने भारताला विजय मिळवून दिला.

टीम इंडियाने 9 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर टी-20 सिरिजमध्ये हरवले

टीम इंडियाने 9 वर्षांनंतर मायदेशात ऑस्ट्रेलियाला टी-20 सिरिजमध्ये पराभूत केले आहे. 2013 पासून कांगारूंचा टी-20 सिरिजमध्ये पराभव करता आला नव्हता. त्या वर्षी एका सामन्यांची सिरिज खेळली गेली, जी भारताने जिंकली होती.

तर, 2017-18 मध्ये, सिरिज 1-1 अशी बरोबरीत राहिली, तर 2018-19 मध्ये ऑस्ट्रेलियाने सिरिज 2-0 ने जिंकली. 2018-19 च्या या सिरिजनंतर टीम इंडियाने घरच्या मैदानावर दहा टी-20 सिरिज खेळल्या आहेत आणि त्यात टीम इंडियाला एकदाही पराभवाचा सामना करावा लागला नाही.

आता जाणून घ्या कोण आहेत विजयाचे हिरो...