आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीचा कसोटी क्रिकेटमधील शतकाचा तीन वर्षांनंतरचा दुष्काळ संपुष्टात आला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी कोहलीने शानदार शतक झळकावले. त्याने 1205 दिवस, 23 सामने आणि कसोटीत 41 डावांनंतर हे शतक केले. हे त्याचे कसोटीतील 28वे आणि एकूण 75वे शतक आहे.
कोहलीच्या शतकानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया येत आहेत. वीरेंद्र सेहवाग, माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू कामरान अकमल आणि वसीम जाफर यांच्यापासून अनेक चाहत्यांनी त्याच्या गौरवात वारेमाप कौतुक केली आहेत. कोहलीच्या खेळी आणि त्याच्या विक्रमावर दिग्गजांच्या सोशल मीडिया प्रतिक्रिया पुढील स्टोरीत जाणून घेणार आहोत.
सेहवागने लिहिले – किंगचे खास 75 वे आंतरराष्ट्रीय शतक
भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने लिहिले की, ही विराटची विलक्षण खेळी आहे. त्याचा स्वतःवर प्रचंड विश्वास आहे. किंगसाठी खास 75 वे आंतरराष्ट्रीय शतक.
पाकिस्तानी क्रिकेटपटूंनीही केले कौतुक
पाकिस्तानचा माजी विकेटकीपर-फलंदाज कामरान अकमलने ट्विट केले, "दीर्घ प्रतीक्षा अखेर संपली... कोहलीचे 28 वे कसोटी शतक." खूप छान खेळला वसीम जाफर त्याच्या कौतुकात म्हणाला, हा आहे फलंदाज विराट कोहली. त्याच्याकडे शक्ती आणि श्स्त्रे दोन्ही आहेत आणि ते कधी वापरायचे हे त्याला माहित आहे. शाब्बास विराट कोहली.
भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांनी लिहिले, खास खेळाडूकडून खास खेळी, विराटची कामगिरी उत्कृष्ट होती. त्याच्यातील विलक्षण भूक आणि तीव्रता व्यतिरिक्त, विराटचे फॉर्ममध्ये परत येणे ही उच्च शक्तीवरील विश्वास आव्हानात्मक काळात कशी मदत करू शकते हे जाणून घेण्यासाठी एक उत्कृष्ट प्रेरणा आहे.गर्व करावी अशीच बाब आहे. प्रसादने त्याच्यासोबत हात जोडलेली इमोजीही बनवले आहे
कोहलीचे 28 वे कसोटी शतक
कोहलीने 23 नोव्हेंबर 2019 रोजी बांगलादेशविरुद्ध शेवटचे 27 वे कसोटी शतक झळकावले. त्याचे हे 28 वे कसोटी शतक आहे. आता कोहलीच्या नावावर 75 आंतरराष्ट्रीय शतके आहेत. त्याने कसोटीत 28, वनडे सामन्यात 46 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एक शतक झळकावले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.