आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

96 वर्षे जुना विक्रम मोडला:दुसर्‍या डावात भारतीय फलंदाजांना दोन आकडी धावा काढू शकले नाही, भारताची कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वात कमी धावसंख्या

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑस्ट्रेलियाचा वेगवाग गोलंदाज जोश हेजलवुडने सर्वाधिक 5 आणि पॅट कमिन्सने 4 गडी बाद केले

अॅडलेडमध्ये खेळलेल्या डे-नाईट टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा 8 गडी राखून पराभव केला. भारताने दुसऱ्या डावात 9 गडी बाद 36 धावा केल्या होत्या. अखेर मोहम्मद शमी दुखापतग्रस्त होऊन रिटायर झाला. यासोबतच भारताचा डावही संपला. ही भारताच्या टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्या होती. याआधी भारतीय टीमचा टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात कमी धावसंख्या 42 होती. 1974 मध्ये लॉ‌र्ड्सच्या मैदानात इंग्लंड विरुद्ध केली होती.

तसेच भारताचा एकही फलंदाज दोन आकडी धावा काढून शकला नाही. 96 वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा रेकॉर्ड केला होता. भारताला पहिल्या डावात 53 धावांची आघाडी मिळाली होती. असे असूनही भारताना सामना जिंकता आला नाही. दुसऱ्या डावात भारताच्या फलंदाजांनी निराश केले. ऑस्ट्रेलियाचा वेगवाग गोलंदाज जोश हेजलवुडने सर्वाधिक 5 आणि पॅट कमिन्सने 4 गडी बाद केले.

बातम्या आणखी आहेत...