आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
यजमान ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील बाॅक्सिंग डे कसाेटीला शनिवारी सुरुवात हाेईल. ही कसाेटी मेलबर्नच्या मैदानावर खेळवली जाणार आहे. जगातील काही देशांमध्ये ख्रिसमस डेनंतरच्या दुसऱ्या दिवसाला म्हणजेच २६ डिसेंबरला बाॅक्सिंग डे म्हटले जाते. यातूनच कसाेटीच्या आयाेजनाला सुरुवात झाली. त्यामुळे १९५० मध्ये २६ डिसेंबर राेजी झालेल्या कसाेटीला बाॅक्सिंग डे टेस्ट म्हणून आेळख मिळाली. ही कसाेटी ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यात झाली हाेती. दरवर्षी या कसाेटी सामन्यांचे आयाेजन केले जाते. १९८० आणि १९८९ मध्ये ही बाॅक्सिंग डे कसाेटी काही कारणास्तव हाेऊ शकली नाही. मात्र, त्यानंतर या कसाेटीचे नित्यनेमाने आतापर्यंत आयाेजन केले जात आहे.
बॉक्सिंग डे कसोटीत भारताचा एक विजय
भारताने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आठ, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच आणि न्यूझीलंड संघाविरुद्ध एक बाॅक्सिंग डे कसाेटी खेळली आहे. यात भारताला एकच बाॅक्सिंंग डे कसाेटी जिंकता आली. मात्र, आता या रेकाॅर्डमध्ये प्रगती साधण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. यातूनच टीमला विजयी ट्रॅकवर येण्याची माेठी संधी आहे.
100वी टेस्ट भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात
ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघ शनिवारी १०० वी कसाेटी खेळणार आहे. दाेन्ही संघांंमध्ये १९४७ मध्ये पहिला कसाेटी सामना झाला हाेता. त्यानंतर आता १०० व्या कसाेटीत हे दाेन्ही संघ शनिवारी समाेरासमाेर असतील. भारताने यात २४ कसाेटी विजय संपादन केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.