आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी- 20:भारत-ऑस्ट्रेलिया आज सामना, भारतीय महिला संघ आता घरच्या मैदानावरील मालिकेचा शेवट गाेड करण्यासाठी उत्सुक

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यजमान भारतीय महिला संघ आता घरच्या मैदानावरील मालिकेचा शेवट गाेड करण्यासाठी उत्सुक आहे. यासाठी भारतीय संघ मंगळवारी पाहुण्या ऑस्ट्रेलिया टीमविरुद्ध मैदानावर उतरणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा शेवटचा टी-२० सामना रंगणार आहे. या मालिकेत सध्या ऑस्ट्रेलिया संघाने ३-१ ने विजयी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाला मालिकेत एकमेव विजयाची नाेंद करता आली. आता संघ दुसरा विजय संपादन करण्यासाठी उत्सुक आहे. या मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियन फलंदाज बेथ मुनीने २००+ धावा काढल्या आहेत. तसेच भारताकडून शेफाली वर्माच्या नावे सर्वाधिक १२७ धावांची नाेंद आहे.

बातम्या आणखी आहेत...