आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात चार कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज फॉर्ममध्ये परतला असून टीम इंडियासाठी ही कठीण गोष्ट आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.न्यूझीलंडविरुद्धची वनडे आणि टी-20 मालिका संपल्यानंतर भारतीय संघापुढे ऑस्ट्रेलियाचे कडवे आव्हान असणार आहे. पण ही मालिका सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियाची चिंता वाढली आहे, कारण ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ हा फॉर्ममध्ये परतला आहे.
स्टीव्ह स्मिथ सध्या बिग बॅशमध्ये खेळत असून त्याने शेवटच्या दोन सामन्यांमध्ये दोन शतके झळकावली आहेत. 21 जानेवारी रोजी झालेल्या सामन्यात स्टीव्ह स्मिथने नाबाद 125 धावा केल्या, त्याने केवळ 66 चेंडू खेळले आणि यादरम्यान त्याच्या बॅटमधून 5 चौकार, 9 षटकार निघाले. यापूर्वी त्याने 101 धावांची खेळी खेळली होती, ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून 5 चौकार आणि 7 षटकार आले होते.
T20 क्रिकेटमध्ये शतक ठोकणे हा मोठा विक्रम मानला जातो आणि T20 डावात सलग दोन शतके करणे हा कोणत्याही फलंदाजासाठी मोठा विक्रम आहे. आता या यादीत स्टीव्ह स्मिथचे नावही जोडले गेले आहे.
डेव्हिड वॉर्नर, उन्मुक्त चंद, ल्यूक राइट, मायकेल कलिंगर, केविन पीटरसन, मार्को मॅरिस, रीझा हेंड्रिक्स, ईशान किशन आणि शिखर धवन यांच्यासह नऊ फलंदाजांनी हा पराक्रम केला होता. भारतासाठी सय्यद मुस्ताक अली ट्रॉफीमध्ये, उन्मुक्त चंदने 2013 मध्ये, इशान किशनने 2019 मध्ये आणि शिखर धवनने आयपीएल 2020 मध्ये ही कामगिरी केली होती.
स्टीव्ह स्मिथ हा सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो आणि तो फॅब-4 चा देखील एक भाग आहे. स्टीव्ह स्मिथचा भारताविरुद्धचा विक्रमही भक्कम आहे, जरी फेब्रुवारीमध्ये भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी त्याच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र स्टीव्ह स्मिथने या मालिकेसाठी आपण पूर्णपणे तयार असल्याचे सांगितले आहे.
भारत ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका
पहिला सामना - 9-13 फेब्रुवारी, नागपूर
• दुसरी सामना - 17-21 फेब्रुवारी, दिल्ली
• तिसरा सामना - 1-5 मार्च, धर्मशाळा
चौथा सामना - 9-13 मार्च, अहमदाबाद
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.