आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • India Vs Australia T 20 Match । Top 5 Reasons Of Team India's Defeat, Flop Bowling, Super Flop Batting, Bhuvneshwar Kumar

टीम इंडियाच्या पराभवाची मुख्य 5 कारणे:आपल्या पाच गोलंदाजांची इकॉनॉमी 11च्या वर होती, तीन झेल सोडले; स्टार फलंदाज फ्लॉप

मोहाली6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीन सामन्यांच्या T-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 4 गडी राखून पराभव केला. 208 धावांची मोठी धावसंख्या उभारूनही भारतीय संघाने चार चेंडू शिल्लक असताना सामना गमावला. टीम इंडिया चांगल्या स्थितीत असूनही जिंकू शकली नाही याची पाच कारणे आम्ही शॉर्टलिस्ट केली आहेत. एकेक करून सर्व कारणांवर नजर टाकूयात.

5. हाय स्कोअरिंग सामन्यात 3 स्टार फलंदाज अपयशी

मोहालीची खेळपट्टी धावांसाठी अनुकूल होती, पण इथेही आपले तीन स्टार फलंदाज सुपर फ्लॉप ठरले. कर्णधार रोहित शर्माने 9 चेंडूंत 11 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट 122 होता. विराट कोहलीने 48 चेंडूंत 31 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट 28 होता. दिनेश कार्तिकने 5 चेंडूंत 6 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट 120 होता. या तीन फलंदाजांनी एकूण 21 चेंडूंचा सामना केला आणि केवळ 19 धावा केल्या. ज्या सामन्यात 10च्या वर रन रेटने धावा झाल्या, त्यात त्यांचा एकत्रित रन रेट 6 पेक्षाही कमी होता.

4. क्षेत्ररक्षकांनी तीन झेल सोडले

भारतीय खेळाडूंनी 3 झेल सोडले, भारताला सामन्यात पुनरागमन करता आले नाही.
भारतीय खेळाडूंनी 3 झेल सोडले, भारताला सामन्यात पुनरागमन करता आले नाही.
  • हाय स्कोअरिंगच्या सामन्यांमध्ये विकेट मिळण्याची शक्यता कमी असते. पण, जर तुम्ही एका डावात तीन झेल सोडले तर जिंकणे कठीण होऊन बसते. भारतीय खेळाडूंनी तीन झेल सोडले. 30 चेंडूंत 61 धावा करणाऱ्या कॅमेरून ग्रीनला अक्षर पटेलने बाद केले. त्यावेळी तो 42 धावांवर खेळत होता.
  • नंतर केएल राहुलने स्टीव्ह स्मिथचा झेल सोडला. ही चूक केएल राहुलने अक्षरच्या चेंडूवर लाँग ऑफवर केली. त्यानंतर स्मिथने 15 चेंडूंत 19 धावा केल्या आणि त्यानंतर 24 चेंडूंत 35 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
  • हर्षल पटेलने त्याच्याच चेंडूवर मॅथ्यू वेडचा झेल सोडला. त्यावेळी वेड 23 धावांवर खेळत होता. अखेरीस तो 45 धावांवर नाबाद राहिला.

3. अक्षर पटेल वगळता सर्व गोलंदाज फ्लॉप

अक्षर पटेल वगळता टीम इंडियाचा एकही गोलंदाज विशेष काही करू शकला नाही. संपूर्ण सामन्यात कर्णधार रोहित शर्मा रागात दिसला.
अक्षर पटेल वगळता टीम इंडियाचा एकही गोलंदाज विशेष काही करू शकला नाही. संपूर्ण सामन्यात कर्णधार रोहित शर्मा रागात दिसला.

भारताची गोलंदाजी अत्यंत सुमार होती. रोहित शर्माने 6 गोलंदाज आजमावले, पण अक्षर पटेल वगळता एकही गोलंदाज किफायतशीर ठरू शकला नाही. भुवनेश्वर कुमारने 4 षटकांत 13 च्या इकॉनॉमीने 52 धावा दिल्या. उमेश यादवने 2 षटकांत 13.5 च्या इकॉनॉमीमध्ये 27 धावा दिल्या. युझवेंद्र चहलने 3.2 षटकांत 12.6 च्या इकॉनॉमीमध्ये 42 धावा दिल्या. हर्षल पटेलने 12.25 आणि हार्दिक पांड्याने 11.25 धावा केल्या. जेव्हा 6 पैकी 5 गोलंदाजांची अशी धुलाई होते, तेव्हा टीम कशी जिंकणार?

2. डेथ ओव्हर्समध्ये पुन्हा भारताची खराब गोलंदाजी

आशिया चषकानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात डेथ ओव्हर्समध्ये टीम इंडियाची खराब गोलंदाजी कायम राहिली.
आशिया चषकानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात डेथ ओव्हर्समध्ये टीम इंडियाची खराब गोलंदाजी कायम राहिली.

16 षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 5 बाद 154 अशी होती. कांगारू संघाला शेवटच्या 24 चेंडूंत 55 धावा हव्या होत्या. पण, डेथ ओव्हर्समध्ये भारतीय गोलंदाज पुन्हा एकदा बेरंग दिसले. भुवनेश्वर कुमारने 17व्या षटकात तीन वाईड टाकले. या षटकात त्याने एकूण 15 धावा दिल्या. 18व्या षटकात आलेल्या हर्षल पटेलने 22 धावा दिल्या. भुवनेश्वर पुन्हा 19व्या षटकासाठी आला. मॅथ्यू वेडने या षटकात 3 चौकार मारले. षटकात एकूण 16 धावा आल्या. अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी फक्त दोन धावा हव्या होत्या ज्या त्याने सहज घेतल्या.

1. दुखापतग्रस्त असताना बुमराहचा संघात समावेश का करण्यात आला?

जसप्रीत बुमराह हा टीम इंडियाचा नंबर-1 गोलंदाज आहे, त्याच्या संघातील अनुपस्थितीचा संघाच्या गोलंदाजीवर मोठा परिणाम झाला आहे.
जसप्रीत बुमराह हा टीम इंडियाचा नंबर-1 गोलंदाज आहे, त्याच्या संघातील अनुपस्थितीचा संघाच्या गोलंदाजीवर मोठा परिणाम झाला आहे.

भारतीय संघाने जसप्रीत बुमराहला प्लेइंग-11 मधून बाहेर ठेवले होते. दुखापतीमुळे बुमराह आशिया कपमध्ये खेळला नव्हता. तो तंदुरुस्त होईल, त्यानंतरच त्याचा संघात समावेश करण्यात येईल अशी अपेक्षा होती. पण, आश्चर्यकारक निर्णय घेत भारतीय थिंक टँकने त्याला पुन्हा विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. तो दुखापतग्रस्त असल्याने संघाचा भाग बनला नाही, असे सांगण्यात आले. तो दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात खेळणार आहे.

अशा परिस्थितीत त्याला बाहेरच ठेवायचेच होते, तर मग त्याला संघात का घेतले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बुमराह डेथ ओव्हर्समध्ये चांगला गोलंदाज मानला जातो. तो या सामन्यात खेळला असता तर निकाल भारताच्या बाजूने लागला असता.

बातम्या आणखी आहेत...