आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहाली मॅचवर पावसाचे सावट:आकाशात दाटून आले ढग, रिमझिम पाऊस सुरु; संध्याकाळी पावसाची शक्यता

मोहाली7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहालीच्या IS बिंद्रा स्टेडियमवर मंगळवारी संध्याकाळी भारत-ऑस्ट्रेलिया T20 सामन्यावर पावसाचे सावट आले आहे. मोहालीचे आकाश सकाळपासून काळ्याकुट्ट ढगांनी व्यापले असून हलकासा पाऊस पडत आहे. हवामान खात्याने दुपारनंतर पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच एवढा मोठा सामना मोहाली स्टेडियमवर होणार आहे.

सामना सायंकाळी 7 वाजता सुरू होईल. त्यावेळी पावसाची शक्यता जास्त आहे. हवामान खात्यानुसार, मान्सून निरोपाच्या मार्गावर असला तरी चंदीगड, मोहाली आणि पंचकुलासह लगतच्या भागात 2-3 दिवस ढगाळ वातावरण राहील. तसेच हलक्या पावसाची शक्यता आहे.

अर्ध्या तासात स्टेडियम कोरडे होईल
सामन्यादरम्यान पाऊस पडल्यास अर्ध्या तासात स्टेडियम कोरडे होईल, असा दावा मोहाली स्टेडियमच्या व्यवस्थापनाकडून करण्यात आला आहे. स्टेडियममधील पाण्याचा निचरा करण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. हवामान खात्याच्या दाव्यानंतर स्टेडियम व्यवस्थापन पूर्णपणे सजग झाले आहे.

स्टेडियम खेळपट्टी अहवाल
आज प्रथम फलंदाजी करणे फायदेशीर ठरेल, त्यामुळे नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावेल. मोहाली स्टेडियमची हिरवीगार खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरेल, त्यामुळे फलंदाजाने सुरुवातीची षटके सावधपणे खेळली पाहिजेत. सामन्याच्या पहिल्या डावात स्विंग दिसून येते आणि जसजसा वेळ जातो तसतशी खेळपट्टी मंद होत जाते.

बातम्या आणखी आहेत...