आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • India Vs Australia T20I Latest Update : All rounder Ravindra Jadeja Ruled Out Of T20 Series Due To Injury, Pacer Shardul Thakur Gets A Chance

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीम इंडियाला मोठा झटका:दुखापतीमुळे अष्टपैलू रविंद्र जडेजा टी-20 मालिकेतून बाहेर, वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरला संघात संधी

सिडनीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जडेजा सध्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली, आवश्यक असल्यास पुढील स्कॅनसाठी नेले जाईल

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यानंतरच भारतीय संघासाठी वाईट बातमी आहे. अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा कन्कशन कॉन्ट्रोवर्सीमुळे टी-20 मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरला संघात स्थान देण्यात आले आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यात जडेजाच्या हेल्मेटवर चेंडू लागला होता. त्यानंतर तो खेळला नाही.

जडेजा सध्या देखरेखीखाली

BCCI ने आपल्या निवेदनात म्हटले की, इनिंग्स ब्रेक दरम्यान मंडळाच्या वैद्यकीय पथकाने जडेजाची तपासणी केली. त्याला सध्या निरीक्षणाखाली ठेवले आहे, आवश्यक असल्यास पुढील स्कॅनसाठी नेले जाईल. जडेजाच्या जागी बदली खेळाडू म्हणून शार्दूल ठाकुरला संधी दिली आहे. शार्दूल ठाकूर एकदिवसीय संघाचा भाग होता.

शार्दूलला 3 सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात संधी दिली होती. त्या सामन्यात त्याने 51 धावा देत 3 गडी बाद केले होते.

जडेजाला हॅम-स्ट्रिंगची तक्रार होती

भारताच्या डावादरम्यान 19 व्या षटकात रविंद्र जडेजाला हॅम-स्ट्रिंगचा त्रास झाला होता. यानंतर 20 व्या षटकात मिचेल स्टार्कचा चेंडू जडेजाच्या हेल्मेटवर लागला होता. जडेजाने या सामन्यात आक्रमक फलदांजी करत 23 चेंडूत 44 धावांची नाबाद खेळी केली होती.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser